शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

हिंदूरक्षणासाठी विहिंपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

By admin | Updated: August 29, 2015 00:04 IST

हिंदूरक्षणासाठी विहिंपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

नाशिक : देशातील हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येवर उपायासाठी तसेच हिंदूरक्षणा- साठी विश्व हिंदू परिषद लवकरच ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करणार असून, याबाबत विहिंपच्या केंद्रीय मार्गदर्शन मंडळाची बैठक येत्या ५ सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वरच्या जुन्या आखाड्यात होणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. देशाला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा मुस्लिमांची लोकसंख्या ६ टक्के होती, ती आता १५ टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे, तर याउलट हिंदूंची लोकसंख्या ८७ टक्क्यांवरून ८० टक्क्यांवर आली आहे. या आकडेवारीचा एकूण विचार करता मुस्लिमांच्या लोकसंख्येत १७ टक्के वाढ झाली असल्याचा दावा तोगडिया यांनी केला.या पार्श्वभूमीवर हिंदूंच्या रक्षणासाठी विहिंप पावले उचलणार असून, दि. ५ रोजी त्र्यंबकेश्वरला केंद्रीय मार्गदर्शन मंडळाची बैठक, तर दि. ६ सप्टेंबर रोजी तपोवनातील संत जनार्दन आश्रमात दुपारी २ ते ६ या वेळेत संत संमेलन होणार आहे. सदर बैठक तसेच संमेलनात हिंदू धर्मीयांच्या हितासाठी योजना तयार केल्या जाणार आहेत. हिंदूंच्या सुरक्षेसाठी देशभरात अभय कवच तयार करण्याच्या दृष्टीने चर्चा केली जाणार आहे. संमेलनाला शेकडो साधू-महंत उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याद्वारे देशभरात हिंदूरक्षणाचा प्रसार-प्रचार केला जाणार असून, याबाबतचे नियोजन बैठकीत व संमेलनात केले जाणार आहे. देशात एक हजार वर्षांपासून हिंदू उपेक्षित असून, रोजगार, शिक्षण, विकासासाठी हिंदूंच्या एकतेची गरज असल्याचेही तोगडिया म्हणाले. यावेळी विहिंपचे व्यंकटेश आबदेव, चंदुभाई पटेल, विजय देशमुख, माधवदास राठी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)