शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वीजी व्यंकटेश : 'थॅलेसेमिया’च्या लढ्यात स्वत:ला एकटे समजू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 18:44 IST

अर्पण थॅलेसेमिया सोसायटी व एच.सी.जी मानवता कॅन्सर सेंटरच्या संयुक्त विद्यमाने थॅलेसेमियाग्रस्त बालक व त्यांच्या पालकांसाठी आयोजित ‘दिवाळी मेळा’ व ‘बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट’ केंद्राच्या शुभारंभप्रसंगी बोलत होत्या.

ठळक मुद्देथॅलेसेमियाग्रस्त बालकांवर मोफत उपचार अत्याचाराविरुध्द वेळीच आवाज उठवावा- शिल्पा शिंदे

नाशिक : थॅलेसेमिया असो की कॅन्सर अशा कुठल्याही दुर्धर आजाराशी लढा देताना कधीही स्वत:ला एकटे समजू नये. आपण एकाकीपणे या आजाराशी झुंज देत आहोत, असा गैरसमज मनातून काढून टाकावा. समाजातील संवेदनशील मनाचे अनेक हात मदतीसाठी उभे आहेत, असे प्रतिपादन मॅक्स फाउण्डेशनच्या विभागप्रमूख व ‘बिर्इंग ह्यूमन’च्या विश्वस्त वीजी व्यंकटेश यांनी केले.अर्पण थॅलेसेमिया सोसायटी व एच.सी.जी मानवता कॅन्सर सेंटरच्या संयुक्त विद्यमाने थॅलेसेमियाग्रस्त बालक व त्यांच्या पालकांसाठी आयोजित ‘दिवाळी मेळा’ व ‘बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट’ केंद्राच्या शुभारंभप्रसंगी बोलत होत्या. यावेळी व्यासपिठावर अभिनेत्री शिल्पा शिंदे, डॉ. राज नगरकर, अर्पण सोसायटीचे अध्यक्ष नरेंद्र शाह, सचिव नंदकिशोर तातेड, डॉ. अतुल जैन, डॉ. गिरीश बदारखे, डॉ. नीलेश वासेकर आदि उपस्थित होते. या केंद्रात भौतिक व वैद्यकिय अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या केंद्रात सात ते दहा खाटा असून केंद्रात बदारखे, वासेकर हे तज्ज्ञ डॉक्टर थॅलेसेमियाग्रस्त बालकांवर मोफत उपचार करणार असल्याचे यावेळी नगरकर यांनी सांगितले. यावेळी शिल्पा शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, बॉलीवुडमध्ये सगळेच ‘हिरो’ असतात असे नाही तसेच वैद्यकिय क्षेत्रातदेखील सगळेच डॉक्टर ‘हिरो’ नसतात. जे समाजाच्या संवेदनांची जाणीव ठेवून वैद्यकिय पेशासोबत प्रामाणिक राहून कर्तव्य बजावतात तेच खरे ‘हिरो’ ठरतात. थॅलेसेमिया हा आजार रक्ताशी संबंधित असून यासाठी मी रक्तदान वेळोवेळी करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी माझ्या रक्ताची मात्रा अधिक चांगली टिकवून ठेवण्याकरिता मी योग्य व पौष्टिक आहार व व्यायामावर भर देत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, शिंदे, व्यंकटेश यांचे स्वागत थॅलेसेमियाग्रस्त बालकांच्या हस्ते करण्यात आले. उच्चशिक्षण घेत यशोशिखर सर करणाऱ्या थॅलेसेमियाग्रस्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रास्ताविक नगरकर यांनी केले.

अत्याचाराविरुध्द वेळीच आवाज उठवावा- शिल्पा शिंदेअन्याय-अत्याचाराविरुध्द वर्षानुवर्षे गप्प राहून त्यानंतर ‘मी टू’ सारख्या चळवळीचा जन्म होण्याची प्रतीक्षा करणे योग्य नाही. अन्याय व अत्याचाराविरुध्द वेळीच आवाज उठविणे गरजेचे आहे. समाजाच्या विकासासाठी ‘मी टू’ चळवळ राबविली गेली पाहिजे. समाजातील विविध घटकांना मदतीच्या हातांची गरज आहे, त्याचा विचार करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

टॅग्स :Healthआरोग्यcancerकर्करोग