नाशिक : शहरातील ज्येष्ठ पत्रकार मधुकर विष्णू कावळे (८६) यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी विविध उपक्रमांमधून सामाजिक कार्यात ठसा उमटविला होता तसेच गांवकरी, सकाळ, भ्रमरसारख्या वृत्तपत्रांमधून पत्रकारिता करत समाजातील विविध समस्यांना वाचा फोडली होती.कावळे हे सामाजिक कार्यकर्ते होते. पत्रकारिताप्रमाणेच सहकार क्षेत्रात देखील त्यांचे कार्य उल्लेखनिय राहिले आहेत. ते सहकारी बॅँक चळवळीचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. समर्थ सहकारी बॅँकेचे ते संस्थापक होत. त्याचप्रमाणे देशस्थ ऋग्वेदी संस्थेचेदेखील कावळे पदाधिकारी होत. त्यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अंतीम इच्छेप्रमाणे देहदान करण्यात आले असून तत्पुर्वी सकाळी त्यांचे जेष्ठ चिरंजीव शशांक कावळे यांच्या निवास्थानी अंत्यदर्शनासाठी पार्थीव ठेवण्यात आले होते. यावेळी शहरातील सामाजिक, राजकिय, शैक्षणिक, सहकार, पत्रकारिता क्षेत्रातील विविध मान्यवरांनी हजेरी लावून त्यांचे अखेरचे दर्शन घेतले. ‘पुढारी’च्या नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक सुधीर कावळे यांचे ते वडील होते.
ज्येष्ठ पत्रकार मधुकर कावळे यांचे निधन
By admin | Updated: March 20, 2017 14:07 IST