शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या कर्मचाºयांची चारित्र्य पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 01:18 IST

र व खुनाच्या प्रकारामुळे राज्यातील शिक्षण विभागाने खासगी शाळांमधील कर्मचाºयांच्या चारित्र्य पडताळणीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने राज्यातील विनाअनुदानित शाळांमधील कर्मचाºयांची पोलीस पडताळणी करून घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागानेही जिल्ह्णातील खासगी शाळांना आदेश देत कर्मचाºयांची पडताळणी करण्यास कळविले आहे.

नाशिक : देशात व राज्यात सातत्याने खासगी शाळांमधील कर्मचाºयांनी शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींवर केलेल्या अत्याचार व खुनाच्या प्रकारामुळे राज्यातील शिक्षण विभागाने खासगी शाळांमधील कर्मचाºयांच्या चारित्र्य पडताळणीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने राज्यातील विनाअनुदानित शाळांमधील कर्मचाºयांची पोलीस पडताळणी करून घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागानेही जिल्ह्णातील खासगी शाळांना आदेश देत कर्मचाºयांची पडताळणी करण्यास कळविले आहे.  माध्यमिक शिक्षण विभागाच्या या आदेशान्वये सोमवारपासून (दि.२५) जिल्ह्णातील सर्व शाळांचा सुरक्षा, स्वच्छता व गुणवत्ता या तीन निकषांवर आढावा घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यात २५ ते २७ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्णातील शाळांचा आढावा घेतला जाणार आहे. सोमवारी चांदवड व येवला येथील सर्व अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहायीत माध्यमिक शाळांचा आढावा झाला. आढाव्यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत शाळेतील सुरक्षा व प्रवासातील सुरक्षेबाबत आढावा घेतला जात आहे. सुरक्षेसोबत विद्यालयाची गुणवत्ता व स्वच्छता याबाबत आढावा घेतला जात आहे. शाळेचा परिसर स्वच्छ करण्यासाठी येत्या २ आॅक्टोबरच्या पंधरवड्यात स्वच्छता हीच सेवा हा उपक्र म राबविण्याचे आदेशदेखील देण्यात आलेले आहेत. याशिवाय माध्यमिकच्या प्रत्येक शाळेला त्यांच्या शाळा इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करून त्याचा अहवाल शिक्षण विभागाला सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.वाहनचालकांच्या वर्तनावरही लक्षशिक्षण विभागाच्या आदेशानुसार शाळेतील सुरक्षेसाठी खासगी स्वयंअर्थहायीत विद्यालयांमधील कर्मचाºयांची पोलीस पडताळणी करणे बंधनकारक केले आहे. विद्यार्थ्यांना घर ते शाळा या दरम्यानच्या सुरक्षेबाबतही योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या जात आहे. ग्रामीणसह शहरी भागात व्हॅन, रिक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. त्यासाठी परिवहन समितीच्या माध्यमातून या वाहनचालकांच्या वर्तनावरही लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.