शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक पश्चिमचा तिढा कायम, आज फैसला होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 00:36 IST

नाशिक : शिवसेनेला जागा न सुटल्याने नाशिक पश्चिममध्ये तिघा इच्छुकांनी बंडखोरी केली असून, या नाराजांचे बंड शमविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. सोमवारी (दि.७) माघारीची अंतिम मुदत असून, त्या पार्श्वभूमीवर नाराजांचे अर्ज माघार घेण्यासाठी शिवसेनेचे संपर्कप्रमुख नाशकात दाखल होणार आहेत.

ठळक मुद्देप्रत्यक्षात जिल्ह्यात एकाही जागेची अदलाबदल झाली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शिवसेनेला जागा न सुटल्याने नाशिक पश्चिममध्ये तिघा इच्छुकांनी बंडखोरी केली असून, या नाराजांचे बंड शमविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. सोमवारी (दि.७) माघारीची अंतिम मुदत असून, त्या पार्श्वभूमीवर नाराजांचे अर्ज माघार घेण्यासाठी शिवसेनेचे संपर्कप्रमुख नाशकात दाखल होणार आहेत.भाजप आणि शिवसेना युतीत नाशिक पश्चिम या जागेचा जिल्ह्याच्या दृष्टीने अडसर होता. प्रत्यक्षात जिल्ह्यात एकाही जागेची अदलाबदल झाली नाही. त्यामुळे विशेष करून नाशिक पश्चिम मतदारसंघातील इच्छुक तसेच नगरसेवक नाराज झाले आहेत. त्यांनी दोन ते तीन दिवसांपासून बंडाचे निशाण फडकावले असून, शिवसेना कार्यालयाच्या बाहेरच निदर्शने केली; परंतु त्यानंतरदेखील मतदारसंघ भाजपकडून मिळण्याची चिन्हे नाहीत व पक्षाकडून तसे संकेतही मिळालेले नाहीत. त्यामुळे शिवसेनेच्या तिघा बंडखोरांनी अर्ज दाखल केले आहेत.वरिष्ठ पातळीवर बंड थंड करण्याची भाषा नेते करीत असले तरी स्थानिक स्तरावर मात्र तसे होताना दिसत नाही. अर्थात, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी हे सोमवारी (दि.७) नाशिकमध्ये येऊन पक्षादेशानुसार नाराजांना अर्ज मागे घेण्यास सांगणार असल्याची माहिती दिली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nashik-west-acनाशिक पश्चिम