शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

विंचूर-प्रकाशा महामार्ग खड्डयात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 13:36 IST

तरसाळी : विंचूर प्रकाशा राज्य महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून या महामार्गावरून मार्गक्र मण करताना ‘रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता’ अशी दयनीय अवस्था झाली असून ,राज्य महामार्ग खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे.

तरसाळी : विंचूर प्रकाशा राज्य महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून या महामार्गावरून मार्गक्र मण करताना ‘रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता’ अशी दयनीय अवस्था झाली असून ,राज्य महामार्ग खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. हा राज्य महामार्ग अडथळ्यांचा बनल्याने प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.या राज्य महामार्गावरून रोज हजारो वाहने ये-जा करतात. हा मार्ग गुजरातला जाण्यासाठी अतिशय जवळच आहे. नाशिक मनमाड धुळे मार्गे मालेगाव सुरत येथेही जाण्यासाठी सोयीचा व जवळचा असून, या भागांमध्ये मोठमोठे उद्योगधंदे वाढले आहेत. त्यांना लागणारा कच्चामाल या महामार्गाने अवजड वाहनातून नेला जात असतो.मागील महिन्यात झालेल्या पावसामुळे या महामार्गावरील कल्याणमध्ये कमालीची भर पडली असून, हे खड्डे चुकवावे तरी कसे असा प्रश्न वाहनचालकांना पडल्याशिवाय राहात नाही. हे खड्डे चुकविण्याच्या नादात येथे रोज छोट्या मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत आहे. रस्त्याच्या मधोमध पडलेले खड्डे व आडवे कटस् यामुळे या महामार्गावरील प्रवास आता जीवघेणा ठरू लागला आहे. या रस्त्यावरु न कोणतेही वाहन चालवितांना अक्षरश: कसरत करावी लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन या रस्त्याच्या दुरु स्तीकडे डोळे झाक करतांना दिसून येत आहे. या रस्त्यावरील जीवघेणे खड्डे लवकरात लवकर दुरूस्त करावेत अशी मागणी वाहनधारकांनी व नागरिकांनी केली आहे. 

टॅग्स :Nashikनाशिक