वणी : सप्तशृंगी देवीच्या गडावर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आजही सुरूच असल्याने तसेच गडावर जाणाऱ्या घाटात दरड कोसळल्याने मोठ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. गणपती घाटात मंगळवारी दरड कोसळली होती. यामुळे रस्त्यावर दगडाचे खच पडले होते. प्रशासनाने हा अडथळा दूर करून दुचाकी वाहनांना प्रवेश सुरू ठेवला आहे. मोठी वाहने व बसला गडावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. खोल दरीकडे जाणारा रस्ता खचल्याने या रस्त्याजवळ बंदोबस्त लावण्यात आला आहे. हा रस्ता दुरुस्तीसाठी आठ ते दहा दिवस लागण्याची शक्यता असल्याने तोपर्यंत मोठ्या वाहनांसाठी गडावर बंदी घालण्यात आली असल्याचे कळविण्यात आले आहे. (वार्ताहर)
सप्तशृंगगडावर वाहनांना बंदी
By admin | Updated: August 4, 2016 00:44 IST