शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातला जाणारी वाहने अडविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 00:02 IST

पंचवटी : नाशिक जिल्ह्यातून शनिवारी सायंकाळी गुजरात राज्यात द्राक्ष तसेच भाजीपाला घेऊन जाणाऱ्या मालवाहू सापुतारा चेक नाक्यावर गुजरात राज्यातील पोलिसांनी कोरोना आरटीपीसीआर चाचणी अहवाल नसल्या कारणाने अडवून धरल्याने दोन तासांपासून चालक चेक नाक्यावर थांबूनच आहे विशेष म्हणजे शंभराहून अधिक मालवाहू वाहने संबंधित चेक नाक्यावर थांबून असल्याने वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या आहेत.

ठळक मुद्दे सापुतारा चेक नाका : द्राक्ष, भाजीपाला वाहनांच्या रांगा

पंचवटी : नाशिक जिल्ह्यातून शनिवारी सायंकाळी गुजरात राज्यात द्राक्ष तसेच भाजीपाला घेऊन जाणाऱ्या मालवाहू सापुतारा चेक नाक्यावर गुजरात राज्यातील पोलिसांनी कोरोना आरटीपीसीआर चाचणी अहवाल नसल्या कारणाने अडवून धरल्याने दोन तासांपासून चालक चेक नाक्यावर थांबूनच आहे विशेष म्हणजे शंभराहून अधिक मालवाहू वाहने संबंधित चेक नाक्यावर थांबून असल्याने वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या आहेत.

कोरोना चाचणी आरटीपीसीआर अहवाल आणा मगच वाहने सोडू अशी भूमिका गुजरात पोलिसांनी घेतल्याने गुजरात राज्याकडे शेतमाल तसेच द्राक्ष माल घेऊन जाणाऱ्या शेकडो वाहनचालकांची मोठी अडचण झाली होती. सध्या संपूर्ण देशभर कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्याने शासन स्तरावर विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत राज्यभरात पंधरा दिवस कडक निर्बंध लागू केले असून यामध्ये मालवाहतूकीला सूट देण्यात आली आहे.शनिवारी सापुतारा चेक नाक्यावर नाशिक जिल्ह्यातील वणी दिंडोरी ओझर पिंपळगाव बसवंत भागातून द्राक्ष व भाजीपाला माल घेऊन जाणारी वाहने दोन तासापासून अडवून ठेवल्याने वाहन चालकांची कोंडी झाली होती सापुतारा चेक नाक्यावर गुजरात राज्यात द्राक्ष व भाजीपाला घेऊन जाणारी वाहने अडविल्यानंतर दिंडोरी तालुक्यातील काही नागरिकांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याशी संपर्क साधून वाहने अडविले याबाबत तक्रार केली त्यानंतर झिरवाळ यांनी जिल्हा प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधत चेक नाक्यावर थांबविलेल्या गाड्या गुजरातकडे रवाना करण्याच्या बाबतीत तोडगा काढण्याबाबत सूचना केल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस