शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी रोडवरील तारवालानगर  चौफुलीवर वाहने सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:39 IST

दिंडोरी रोडवरील तारवालानगर चौफुली ही दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालली असून, आठवडाभरात रात्रीच्या वेळी किमान दोन ते तीन अपघात होतात़ चौफुलीवरील झेब्रा क्रॉसिंग तसेच पांढरे पट्टे अस्पष्ट झालेले असून, रात्रीच्या वेळी सिग्नल यंत्रणा बंद असल्याने वाहनधारक सुसाट असतात़ या ठिकाणचे बहुतांशी अपघात हे वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याने झालेले असून, या वेगमर्यादेला ‘ब्रेक’ची आवश्यकता आहे़

नाशिक : दिंडोरी रोडवरील तारवालानगर चौफुली ही दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालली असून, आठवडाभरात रात्रीच्या वेळी किमान दोन ते तीन अपघात होतात़ चौफुलीवरील झेब्रा क्रॉसिंग तसेच पांढरे पट्टे अस्पष्ट झालेले असून, रात्रीच्या वेळी सिग्नल यंत्रणा बंद असल्याने वाहनधारक सुसाट असतात़ या ठिकाणचे बहुतांशी अपघात हे वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याने झालेले असून, या वेगमर्यादेला ‘ब्रेक’ची आवश्यकता आहे़  दिंडोरी रोडवरील तारवालानगर चौफुलीवर अमृतधाम चौफुलीकडून येणारे, दिंडोरीरोड, मार्केट यार्ड तसेच नाशिककडून म्हसरूळ, दिंडोरी रोडकडे वाहने जातात़ या ठिकाणी महापालिकेने सिग्नल यंत्रणा बसविली असली तरी वाहनधारक सिग्नल सुटेपर्यंत प्रतीक्षादेखील करीत नाही़  या चौफुलीवर वाहतूक पोलीस हे केवळ दंडवसुलीसाठी नियुक्त केले आहेत की काय, असे चित्र असते़ त्यामुळे या ़ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसाची नेमणूक करावी तसेच मुंबई-आग्रा रोडवर एकाच ठिकाणी टाकलेले पाच-सहा एकत्रित गतिरोधक बसवावे जेणेकरून प्रत्येक वाहनधारक या ठिकाणी वाहनाचा वेग कमी करेल व अपघातांची संख्या कमी होईल़तारवालानगर चौफुलीवर पूर्वी वळणरोड लहान असल्याने लावण्यात आलेली सिग्नल यंत्रणा तसेच वृक्षावर वाहने आदळल्याच्या घटना घडलेल्या असून, अनेकांचे जीवही गेलेले आहेत़ रस्ता रुंदीकरण केल्यानंतर रात्रीच्या वेळी या चौफुलीवरून भरधाव वाहने धावत असल्यामुळे पादचारी व दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून चौफु ली पार करावी लागते़ या ठिकाणी सीसीटीव्ही बसविलेले आहे.याद्वारे किमान कोणत्या वाहनधारकाची चूक आहे हे पोलिसांच्या लक्षात येते़ तारवाला चौफुलीवर स्थानिक नागरिकांनी गतिरोधकाची मागणी केली की महामार्ग असल्याचे कारण पुढे केले जाते. त्यामुळे आणखी किती जणांचा बळी गेल्यानंतर या ठिकाणी गतिरोधक टाकले जाणार? असा सवाल नागरिक करतात़ या चौफुलीबाबत उपाययोजना केली जात नसल्याने चौक असुरक्षित बनला आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडी