शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

त्र्यंबक मंदिराला वाहनांचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 00:46 IST

त्र्यंबकेश्वर : बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेले येथील त्र्यंबकराजाचे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले असले तरी मंदिरात प्रवेश करताना प्रवेशाचे नियोजन, बाहेर मात्र फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचे दिसून येत आहे. मंदिर परिसराला वाहनांचा वेढा पडत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.

ठळक मुद्देदुर्लक्ष : मंदिरात प्रवेशाचे नियोज; बाहेर फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा !

प्रारंभी मंदिरात भाविकांची गर्दी कमी होती; मात्र दिवसेंदिवस गर्दी वाढत असून, भाविक एकमेकांना खेटुन गर्दी करून मंदिरात प्रवेश करतात. कोविड -१९ चे बहुतेक निर्बंध उठवण्यात आले असून, फिजिकल डिस्टन्सिंग व मास्क मात्र बंधनकारक आहे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर देवस्थान ट्रस्टतर्फे खबरदारी घेतली जात आहे. इन्फ्रारेड थर्मामीटरने शरिरातील तापमान तपासले जात आहे. सॅनिटायझेशन करूनच मंदिरात सोडले जाते. आणि गर्भगृहासमोरुन फक्त हात जोडून दर्शन घेरून बाहेर पडावे लागते. यात कुठलेही उल्लंघन होत नाही. अर्थात देवस्थान प्रशासन पूर्ण काळजी घेत असले तरी रस्त्यावरून बाहेर पडणाऱ्यांचा प्रश्न निर्माण होत आहे. काही लोक तर तोंडावर मास्कदेखील घेत नाहीत. काही जण मास्क अडकवितात; पण मास्क मात्र गळ्यात असतो. मास्कने तोंड व नाक डोळ्याच्या खालपर्यंत घेतलेला असावा, पण येथे तर कोणीच काळजी घेत नाही. वास्तविक याबाबतची खबरदारी नगर परिषद व पोलीस प्रशासनाने घ्यावयास हवी. नगर परिषदेने मास्क न घातल्यास दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे.अर्थकारण रूळावरमंदिरे उघडल्यापासून त्र्यंबकेश्वर शहराचे अर्थकारण रुळावर आले आहे. धार्मिक विधी पुरोहित गाइडपासून ते रिक्षावाले, हॉकर्स गायींना चारा विकणाऱ्या महिला फळफुले, प्रसादी वाण भेट वस्तु घरात ठेवण्यासाठी वस्तु हॉटेल लॉजिंगवाले आदी सर्वांचे अर्थचक्र सुधारले असल्याचे चित्र दिसून येत आहे. सुरक्षिततेसाठी मंदिर परिसरात बॅरिकेडींग केलेली आहे; पण सध्याचे चित्र पाहता काही चारचाकी वाहने अर्थात कार थेट त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर उभ्या राहून त्यातील प्रवासी उतरतात, तर दुचाकीवर आलेल्या प्रवाश्यांमुळे थेट मंदिरासमोर जणू अघोषित वाहनतळ उभारण्यात आले आहे. भाविकांची गर्दी, वाहनतळ यामुळे मंदिरासमोर गर्दीच गर्दी दिसून येते. बाहेरची वाहने थेट त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर उभी राहतात. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शिवनेरी बिल्डींगमध्ये जागा, जमिनीचे, शेतीचे, घरांचे व्यवहार सहायक उपनिबंधक कार्यालयात केले जातात. यावेळी खरेदी-विक्री करणारे आदींची वाहने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पार्क केली जातात. ही वाहने व व्यवहार करण्यासाठी आलेली वाहने यामुळे मंदिर परिसर खासगी दुचाकी, चारचाकी यांनी व्यापून टाकला आहे.

टॅग्स :NashikनाशिकTrafficवाहतूक कोंडी