शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

वणी बाजारात वाहनांना रिफ्लेक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:22 IST

वाहन इतक्या वेगात चालवू नये की आपला ताबा त्यावरून सुटून अपघात होईल. वाहन चालवताना हुल्लडबाजी करू नये. कोणतीही नशा करून वाहन चालवू नका. नियमांचे पालन करूनच वाहन चालवा. प्रत्येकाला आपला जीव प्रीय आहे, याचे भान प्रत्येकाने ठेवल्यास निश्चितच अपघातांची संख्या कमी होईल, असे प्रतिपादन प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी केले.

वणी : वाहन इतक्या वेगात चालवू नये की आपला ताबा त्यावरून सुटून अपघात होईल. वाहन चालवताना हुल्लडबाजी करू नये. कोणतीही नशा करून वाहन चालवू नका. नियमांचे पालन करूनच वाहन चालवा. प्रत्येकाला आपला जीव प्रीय आहे, याचे भान प्रत्येकाने ठेवल्यास निश्चितच अपघातांची संख्या कमी होईल, असे प्रतिपादन प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी केले.  वणी येथे उपबाजार आवारात ‘रिफ्लेक्टर लावा’ या अभियानाप्रसंगी ते बोलत होते. दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती व प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी सभापती दत्तात्रय पाटील, जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव पाटील, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक माणिकराव सोनवणे, तुकाराम कर्डिले, भास्कर भगरे, डॉ. योगेश गोसावी, उपसरपंच विलास कड, मधुकर भरसट, मुन्ना मणियार, संजय उंबरे, नंदलाल चोपडा प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. यावेळी दत्तात्रय पाटील, गणपतराव पाटील, माणिकराव सोनवणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. बाजार समितीत माल घेऊन येणाºया ट्रॅक्टर ट्रॉलीला रिफ्लेक्टर नसल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. अपघात टाळण्यासाठी ‘रिफ्लेक्टर लावा’ उपक्रम स्तुत्य असून, विना परवाना वाहन चालविणे हे धोक्याचे आहे. प्रत्येक कुटुंब हे आपले कुटुंब आहे अशी भावना ठेऊन काळजी घेतल्यास अपघात टळण्यास मदत होईल, असेही मत पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी प्रादेशिक परिवहन विभागाचे हेमंत हेमाडे, प्रज्ञा अभंग, प्रशांत थोरात, राहुल कदम, पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील, बाजार समिती उपसभापती अनिल देशमुख, संचालक व वाहनधारक उपस्थित होते.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड