शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मृत जनावरे उचलण्यास वाहनव्यवस्था; मात्र कर्मचारी नसल्याने अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 00:12 IST

महापालिकेच्या वतीने सिडको, सातपूर व पश्चिम या तीन विभागांसाठी मृत जनावरे उचलण्यासाठी वाहनाची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. परंतु वाहनचालकाव्यतिरिक्त एकही कर्मचारी या वाहनावर देण्यात आलेला नसल्याने मृत जनावरे उचलण्यासाठी अडचणी येत असल्याचे समजते.

सिडको : महापालिकेच्या वतीने सिडको, सातपूर व पश्चिम या तीन विभागांसाठी मृत जनावरे उचलण्यासाठी वाहनाची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. परंतु वाहनचालकाव्यतिरिक्त एकही कर्मचारी या वाहनावर देण्यात आलेला नसल्याने मृत जनावरे उचलण्यासाठी अडचणी येत असल्याचे समजते.नागरी वस्तीत तसेच मोकळ्या जागेत अनेकदा मृत जनावरे आणून टाकली जातात. सदर मृत जनावरांना उचलण्यासाठी महापालिकेकडे पूर्वी व्यवस्था नव्हती. यामुळे मृत जनावरे दोन ते तीन दिवस उचलले जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरत होती. परंतु आता महापालिकेने सिडको, सातपूर व पश्चिम या तीन विभागासाठी मृत जनावरे उचण्यासाठी वाहनाची स्वतंत्र व्यवस्था केली आहे.  ही स्वागतार्ह बाब असली तरी या वाहनावर चालकाव्यतिरिक्त एकही कर्मचारी देण्यात आलेला नसल्याने मृत कुत्रे, मांजर तसेच इतर मृत जनावरे उचलण्यासाठी अडचणी येत आहे.  या वाहनावरील चालकालाच सफाई कर्मचाऱ्यांची मनधरणी करून मृत जनावरे उचलावी लागत आहे. यातच दुपारी एक ते सहा या वेळात सफाई कर्मचाºयांची सुट्टी असते त्या वेळात मात्र वाहनचालकाला मोठी कसरत करावी लागत असल्याचे समजते. या वाहनचालकास सिडको, सातपूर व पश्चिम विभागातील मृत जनावरे उचलण्याची जबाबदारी असून, एवढ्या मोठ्या परिसरातून दररोज दहा ते पंधरा व त्यापेक्षाही अधिक मृत जनावरे उचलावी लागत आहेत.वाहनचालकाची दमछाकमनपाच्या वतीने मृत जनावरे उचलण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली असली तरी सिडको, सातपूर तसेच पश्चिम विभागासाठी वाहनचालकाला ही सर्व जबाबदारी पार पाडावी लागत आहे. चालकाने वाहन चालविण्याबरोबरच मृत जनावरे (कर्मचारी नसल्याने) देखील उचलण्याचे काम करावे लागत असल्याने वाहनचालकाची चांगलीच दमछाक होत असल्याचे समजते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका