शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील वाहनधारक पेट्रोल दरवाढीने हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 00:09 IST

देवगांव : त्र्यंबकेश्वर तालुका आदिवासी ग्रामीण तसेच अतिदुर्गम भागात बेरोजगारी सारख्या प्राथमिक समस्या असतांना पेट्रोलच्या प्रति लिटर दराने शंभरी पार केल्याने आदिवासी ग्रामीण भागातील जनतेच्या जीवनावर परिणाम झाला आहे.

ठळक मुद्देपेट्रोलच्या किंमतीने शंभरी पार केल्याने खिशाला मोठी झळ बसत

देवगांव : त्र्यंबकेश्वर तालुका आदिवासी ग्रामीण तसेच अतिदुर्गम भागात बेरोजगारी सारख्या प्राथमिक समस्या असतांना पेट्रोलच्या प्रति लिटर दराने शंभरी पार केल्याने आदिवासी ग्रामीण भागातील जनतेच्या जीवनावर परिणाम झाला आहे.कोरोना संसर्गाच्या फैलावावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे उद्योगधंदे बंद पडले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात बेरोजगारी वाढली आहे. त्यातच पेट्रोलच्या दराने शंभरी पार केल्याने देवगांव परिसरातील दुचाकीधारक तसेच पेट्रोलवर चालणाऱ्या वाहने आणि ग्रामीण भागातील जनता मेटाकुटीस आले आहेत.राज्य शासनाच्या ' ब्रेक दी चेन' साठी इगतपुरी आगारातील फेऱ्या देखील कमी करण्यात आल्या असून प्रवास करताना उभ्याने प्रवास करणे बंदी असल्याने ग्रामीण भागातून कोणत्याही भागात ये जा करण्यासाठी दुचाकी शिवाय पर्याय शिल्लक राहिला नाही. अशातच पेट्रोलचा खर्च परवडत नसल्याने एका दुचाकीवर तीन व्यक्ती ये जा करत असतात.मात्र, पेट्रोलने शंभरी गाठल्यामुळे अडचणीत भर पडली आहे. स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल, डाळी आणि भाज्या प्रचंड प्रमाणात आधीच महागल्याने नागरिक आधीच त्रस्त असताना आता पेट्रोलचे दर वाढल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या संकटामुळे हैराण झालेल्या जनतेला महागाईच्या झळा सोसवेना झाल्या आहेत.पेट्रोलच्या किंमतीने शंभरी पार केल्याने खिशाला मोठी झळ बसत आहे. कोरोनाच्या निर्बंधांमुळे बससेवा बंद असल्यामुळे किराणा, दवाखाना, शेतीची कामे, बँक कामे आदींसाठी दुचाकीशिवाय पर्यायच नाही.- लक्ष्मण देहाडे, दुचाकीधारक. (०२ देवगाव)

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतtalukaतालुका