सिन्नर : नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाकडून वाहनांची तपासणी करण्यात आली. अवैध दारु किंवा पैसे वाटप केले जावू नये यासाठी काळजी घेण्यासाठी भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर नाका, घोटी चौफुलीवरील गावठा भागातील मारुती मंदिर, आडवा फाटा, देवीरोड, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र या रस्त्यावर भरारी पथकाने वाहने थांबवून तपासणी केली. या भरारी पथकात निवडणूक शाखेच्या कर्मचाऱ्यांसह पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यांनी चेकपोस्टवर वाहनांची झाडाझडती घेतली. भरारी पथकात पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी प्रविण गायकवाड, पोलीसं उपनिरिक्षक के. व्ही. चव्हाण, हवालदार आर. व्ही. झगडे, के. आर. मुंडे यांच्यासह विस्तार अधिकारी ए एस. चव्हाण, सुनील शिंदे, उपनिरीक्षक ए. डी. केदारे, ए. पी. ऐसी, एस. बी. घाणे सहभागी झाले होते. (वार्ताहर)
सिन्नरला वाहनांची तपासणी
By admin | Updated: November 16, 2016 01:29 IST