शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्याची रोपे फेकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:40 IST

भाजीपाल्याला योग्य भाव मिळत नसल्याने बहुतेक त्रस्त शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड थांबविली आहे. यामुळे परिसरातील भाजीपाला नर्सरीचालकांना तयार भाजीपाल्याची रोपे फेकून द्यावी लागत आहे.

नाशिकरोड : भाजीपाल्याला योग्य भाव मिळत नसल्याने बहुतेक त्रस्त शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड थांबविली आहे. यामुळे परिसरातील भाजीपाला नर्सरीचालकांना तयार भाजीपाल्याची रोपे फेकून द्यावी लागत आहे. सध्या बाजारात भाजीपाल्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकºयांना आलेल्या खर्चापेक्षा कमी भावात व्यापारी भाजीपाला खरेदी करत आहे. शेतकºयांकडून व्यापारी वर्ग ३० ते ५० पैसे किलोने कोबीची खरेदी करत आहे, तर शेतकयांना भाजीपाला नर्सरीतून ५० ते ६० पैशाला कोबीचे तयार रोप खरेदी करावे लागते. त्या कोबीच्या रोपांची लागवड केल्यानंतर त्यावर होणारा खर्च, कष्ट मोठ्या प्रमाणात होतात. भाजीपाल्याला योग्य भाव शेतकºयांना सध्या मिळत नाही. त्यामुळे बहुतेक शेतकºयांनी सध्या भाजीपाल्याची लागवड करणे थांबविले आहे. त्याचा मोठा परिणाम भाजीपाला नर्सरीवर झाला आहे.  नाशिक शहराच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागातील भाजीपाला नर्सरीमध्ये दरवर्षीच्या अनुभवानुसार कोबी, फ्लॉवर, मिरची, टमाटे, वांगे, कारले, भोपळा आदी भाजीपाल्याच्या रोपांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र शेतकरी भाजीपाल्याची रोपेच घेत नसल्याने भाजीपाला नर्सरीचालकांना वय झालेली भाजीपाल्याची रोपे ट्रेमधून काढून प्लॅस्टिक गोण्यांमध्ये भरून अक्षरश: फेकून देण्यात येत आहे.केवळ १० टक्के रोपांची विक्रीसर्वच भाजीपाला नर्सरीमध्ये फक्त १० ते २० टक्के भाजीपाला रोपांची विक्री होत आहे. सर्वच नर्सरीचालकांवर रोपे फेकून देण्याची वेळ आली आहे. पुढील दीड-दोन महिन्यांनंतर भाजीपाल्याचा तुटवडा जाणवण्याची व त्यामुळे भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.नर्सरीचालकांचे आर्थिक नुकसानजवळपास सर्वच नर्सरीचालकांनी अनुभव व अंदाजानुसार भाजीपाला रोपांची लागवड केली होती. मात्र गेल्या चार महिन्यांत झालेल्या खर्चापेक्षा कमी भाव शेतकºयांना मिळाल्याने सध्या शेतकºयांनी भाजीपाला लागवडीत आखडता हात घेतला आहे. त्यामुळे वय झालेली तयार भाजीपाला रोपे फेकून देण्याची वेळ आल्याने नर्सरीचालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.- हिरामण दशरथ आडके, श्रीमंत नर्सरी, नानेगाव

टॅग्स :Farmerशेतकरी