शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाज्यांचे दर स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:14 IST

भाज्यांचे दर स्थिर झाल्याने दिलासा नाशिक : डिसेंबरच्या प्रारंभी घसरलेले जिल्ह्यातील पालेभाज्यांचे दर काहीसे स्थिरावले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना काही ...

भाज्यांचे दर स्थिर झाल्याने दिलासा नाशिक : डिसेंबरच्या प्रारंभी घसरलेले जिल्ह्यातील पालेभाज्यांचे दर काहीसे स्थिरावले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात परतावा मिळू लागला आहे. बाजारात आवक होणाऱ्या पालेभाज्यांचा आधीच्या तुलनेत उठाव होऊ लागल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. फळभाज्यांनादेखील चांगल्या प्रमाणात भाव मिळू लागला आहे.

सीबीएस परिसराला

पार्किंगचा वेढा

नाशिक : नवीन सीबीएस परिसरात कुटुंबीयांना सोेडायला येणारे नागरिक तसेच त्या भागातील दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकांकडून त्यांची वाहने रस्त्याच्या दुतर्फा पार्क केली जात असल्यामुळे नवीन सीबीएससमोरील तसेच सिव्हिलच्या वॉलकम्पाउंडकडील दोन्ही बाजू या वाहनांनी व्यापून जातात. त्यामुळे त्या रस्त्यावरून दुचाकी, चारचाकी वाहनांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.

-------------

पदपथ विक्रेत्यांनी

व्यापले रस्ते

नाशिक : महानगरातील मुख्य बाजारपेठेतील बहुतांश रस्ते हे पदपथ विक्रेत्यांनी व्यापले असल्याने नागरिकांना बाजारपेठेतून चालण्यासाठी मुख्य रस्त्याचाच वापर करावा लागतो. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांच्या गर्दीत पादचाऱ्यांची अधिक भर पडून संपूर्ण रस्ताच ठप्प होण्याचे प्रकार शनिवार, रविवारसारख्या सुट्टीच्या दिवशी घडत आहेत.

-------------

वाहत्या रस्त्यांवर

पार्किंग ठरते अडथळा

नाशिक : शिंगाडा तलाव परिसरातील विविध कार ॲक्सेसरीज दालनांसमोर मोठ्या प्रमाणात कारचे पार्किंग केले जात असल्याने त्या रस्त्यावरून अन्य वाहनांना वाहतुकीस अडथळा ठरत आहे. प्रारंभी केवळ दुकानांजवळील रस्त्यावर असलेले पार्किंग आता थेट मुख्य रस्त्याचा पावपेक्षा अधिक भाग व्यापू लागल्याने वाहतुकीत अनेकदा अडथळे निर्माण होत आहेत.

-----

वाहतूक बेटांवरील

गवत पुन्हा वाढले

नाशिक : शहरातील वाहतूक बेटांवरील गवत पावसाळ्यानंतर कापण्यात आले हाेते; मात्र गत दोन महिन्यात पुन्हा अनेक वाहतूक बेटांवरील गवत पुन्हा वाढल्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना ते त्रासदायक ठरू लागले आहे, तसेच दुभाजकांमधील वाढलेले गवतदेखील रस्ता क्रॉस करताना वाहनचालकांच्या दृष्टीस अडथळा ठरू लागले आहे.