शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

पितृपक्षाच्या प्रारंभी भाज्यांचे दर वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 18:42 IST

शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले असून यामुळे काही शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे तर काहींच्या भाजीपाल्यांच्या उत्पादनात घट होत आहे. यामुळे ऐन पितृपक्षात भाज्यांचे भाव वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. या दिवसांत भाजीपाल्याला मोठी मागणी असल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांकडून हे भाव वाढविण्यात आले आहे.   

ठळक मुद्देभाज्यांचे भाव गगणाला भिडले आहे.अजून १५ दिवस भाज्यांचे दर असेच राहणार पावसाचा जोर कायम राहिला तर भाव अधिक वाढण्याची शक्यता

नाशिक : शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले असून यामुळे काही शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे तर काहींच्या भाजीपाल्यांच्या उत्पादनात घट होत आहे. यामुळे ऐन पितृपक्षात भाज्यांचे भाव वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. या दिवसांत भाजीपाल्याला मोठी मागणी असल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांकडून हे भाव वाढविण्यात आले आहे.   पितृपक्ष म्हणजे आपल्या पुर्वजांना स्मरण करून त्यांना विविध पकवनांचा नवैद्य दाखविण्यात येतो. भाद्रपद पोर्णिमेपासुन पितृपक्षास सुरूवात होत असते. त्यामुळे या दिवसांत भाज्यांना मोठी मागणी असते. त्यात मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्यामुळे भाज्यांचे भाव गगणाला भिडले आहे. भाज्यांमध्ये कारले, आळुची पाने, मेथी, पालक, गवार, वाल, भोपळा यांचे भाव वाढले आहे. १० दिवसांपुर्वी भाज्यांचे भाव आवाक्यात होते मात्र पावसाची सुरूवात होताच मार्केटमध्ये भाज्यांची आवक घटली आहे. परिणामी याचा फटका भाज्यांवर झालेला दिसून येत आहे. तसेच कांद्याची आवकही मोठ्या प्रमाणावर कमी झाली असल्यामुळे कांद्याचे भावही गगणाला भिडत आहे.  त्यामुळे  त्यात पितृपक्षाची आता सुरुवात झाली असून अजून १५ दिवस भाज्यांचे दर असेच राहणार असल्याचे विक्रते सांगत आहेत. तसेच पावसाचा जोर वाढला तर भाज्यांच्या भावात असुन वाढ होण्याची शक्यता आहे.      पावसाचा फटका  नाशिक जिल्हा पालेभाज्यांसह कांद्याच्या उत्पादनात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. मागील महिन्यात जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पालेभाज्यांना मोठा फटका बसला होता तेव्हाही भाज्यांचे दर गगणाला भिडले होते. मात्र पावसाने उघडीप दिल्यानंतर दर पुन्हा आवाक्यात आले होते. जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढत असून त्यामुळे काही भागांतील शेतकºयांचे नुकसान झाल्यामुळे मार्केटमध्ये भाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे भाव वाढविण्यात आल्याचे विक्रेते सांगत आहे. 

असे आहे भाज्यांचे दर  चवळी : ५० ते ६० रुपये किलो  कोथिंबीर जुडी: ७० ते ८० रूपये  शिमला मिर्ची : ६० ते ७० रुपये किलो  गवार : १०० ते १२० रुपये किलो  भेंडी : ४० रुपये किलो  मेथीची जुडी : २० रुपये  अळुची पाने : १५ ते २० रूपयांना १० पाने  कारले : ४० ते ५० रुपये किलो  वाल : ४० ते ६० रुपये किलो  कांदा : ४० ते ५० रुपये किलो

पुन्हा भाव वाढण्याची शक्यता  पावसाचा जोर असाच कायम राहिला तर भाज्यांचे भाव अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यात पितृपक्षामुळे भाज्यांना मागणी वाढत असून त्याप्रमाणात आवक नसल्यामुळे परिणामी भाव वाढवावे लागत आहे. यामध्ये जवळपास सर्वच भाज्यांचे भाव वाढले आहे.   विजय डावरे, भाजीविक्रेता    

टॅग्स :Nashikनाशिकvegetableभाज्या