शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

भाज्यांचे दर कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 00:35 IST

शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले असून, यामुळे काही शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. तर काही भाजीपाल्यांच्या उत्पादनात घट होत आहे. यामुळे ऐन पितृपक्षात भाज्यांचे भाव वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

नाशिक : शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले असून, यामुळे काही शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. तर काही भाजीपाल्यांच्या उत्पादनात घट होत आहे. यामुळे ऐन पितृपक्षात भाज्यांचे भाव वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. या दिवसांत भाजीपाल्याला मोठी मागणी असल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांकडून हे भाव वाढविण्यात आले आहे.पितृपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांना स्मरण करून त्यांना विविध पकवानांचा नैवेद्य दाखविण्यात येतो. भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्षास सुरुवात होत असते. त्यामुळे या दिवसांत भाज्यांना मोठी मागणी असते. त्यात मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्यामुळे भाज्यांचे भाव गगणाला भिडले आहे.भाज्यांमध्ये कारले, आळूची पाने, मेथी, पालक, गवार, वाल, भोपळा यांचे भाव वाढले आहे.दहा दिवसांपूर्वी भाज्यांचे भाव आवाक्यात होते, मात्र पावसाची सुरुवात होताच मार्केटमध्ये भाज्यांची आवक घटली आहे. परिणामी याचा फटका भाज्यांवर झालेला दिसून येत आहे. तसेच कांद्याची आवकही मोठ्या प्रमाणावर कमी झाली असल्यामुळे कांद्याचे भावही गगणाला भिडत आहे. त्यामुळे त्यात पितृपक्षाची आता सुरुवात झाली असून, अजून १५ दिवस भाज्यांचे दर असेच राहणार असल्याचे विक्रते सांगत आहेत.तसेच पावसाचा जोर वाढला तर भाज्यांच्या भावात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.नवरात्रात भाव वाढण्याची शक्यतानाशिक जिल्हा पालेभाज्यांसह कांद्याच्या उत्पादनात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. मागील महिन्यात जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पालेभाज्यांना मोठा फटका बसला होता तेव्हाही भाज्यांचे दर गगणाला भिडले होते. मात्र पावसाने उघडीप दिल्यानंतर दर पुन्हा आवाक्यात आले होते. जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढत असून, त्यामुळे काही भागांतील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे मार्केटमध्ये भाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे भाव वाढविण्यात आल्याचे विक्रेते सांगत आहे.पावसाचा जोर असाच कायम राहिला तर भाज्यांचे भाव अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यात पितृपक्षामुळे भाज्यांना मागणी वाढत असून, त्याप्रमाणात आवक नसल्यामुळे परिणामी भाव वाढवावे लागत आहे. यामध्ये जवळपास सर्वच भाज्यांचे भाव वाढले आहे.- विजय डावरे, भाजीविक्रेता

टॅग्स :vegetableभाज्याNashikनाशिकMarketबाजार