शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक बाजार समितीत भाज्यांचे भाव कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 01:16 IST

राष्ट्रीय किसान महासंघ व किसान एकता मंचाने पुकारलेल्या देशव्यापी शेतकरी संपामुळे शुक्रवारी (दि.१) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाज्यांची आवक घटली असून, भाज्यांचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहे.

नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघ व किसान एकता मंचाने पुकारलेल्या देशव्यापी शेतकरी संपामुळे शुक्रवारी (दि.१) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाज्यांची आवक घटली असून, भाज्यांचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहे. देशव्यापी संपाला शहर परिसर व संपूर्ण तालुक्यातून संमिश्र प्रतिसाद मिळत असला तरी शेतकऱ्यांमध्ये शेतमाल करणाºया वाहनांचे नुकसान होण्याची भीती असल्याने अनेक शेतकºयांनी आंदोलनाच्या पहिल्या दिवशी शेतीमाल बाजार न नेण्याचा निर्णय घेतल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात केवळ ३० टक्केच शेतमाल विक्रीसाठी आला होता.  पुणतांब्यातील शेतकºयांनी गेल्यावर्षी १ जूनला पुकारलेल्या शेतकरी संपाला नाशिक जिल्ह्णातून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्याचप्रमाणे ३ जूनच्या मध्यरात्री सरकार आणि आंदोलनाच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या चर्चेनंतर शेतकºयांची फसवणूक झाल्याची भावना शेतकºयांमध्ये पसरल्याने संपाची धुरा हातात घेणाºया नाशिक जिल्ह्णातच यावेळी संपाला अनेक भागांतून अत्यल्प तर काही भागांतून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. गेल्यावर्षी एकजुटीने संपाची धग सरकारपर्यंत पोहचविणाºया नाशिक जिल्ह्णात शेतकरी संपात एक जुटीचा अभाव दिसून आला असून, संप यशस्वी करण्याची जबाबदारी असलेले शेतकरी नेतेही दुसºया जिल्ह्णात असल्याने आंदोलनात समन्वयाचाही अभाव दिसून आला. दरम्यान, नाशिक जिल्ह्णातील मालेगाव, देवळा, सटणा, विंचूर, चांदवड, मनमाड, निफाड सायखेडा, सिन्नर परिसरासह पेठ, सुरगाणा परिसरातील गोळशी फाट्यावर आंदोलकांनी भाजीपाल्याची वाहने अडविण्याचा प्रयत्न झाला. परंतु पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे परिसरातील वाहने बाजार समितीत दाखल होऊ शकली. बाजार समितीत आलेल्या सर्व कृषिमालाचे लिलाव नियमितपणे सुरू होते. परंतु आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी आवक घटल्याने भाजीपाल्याचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले.शेतकरी संघटनांच्या वेगळ्या चुलीगेल्यावर्षी एकजुटीने संपात उतरलेल्या वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी यावर्षी वेगवेगळ्या चुली मांडल्याचे दिसून आले. किसान सभेने शेतकरी कर्जमुक्ती, हमीभाव व वनजमिनी कसणाºया शेतकºयांच्या नावे करण्याची मागणी करीत आंदोलन केले, तर नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीने हुतात्मा स्मारकात अभिवादन सभा घेऊन शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून हुतात्मा झालेल्या शेतकरी व शेतकरी नेत्यांना अभिवादन केले. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विभागीय निबंधकांना निवेदन देऊन शेतकºयांच्या सातबारा उताºयावर बँकांचे नाव न लावण्याची मागणी केली.

टॅग्स :vegetableभाज्या