शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

चिंचोलीच्या जवानाला सिक्कीममध्ये वीरगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 14:21 IST

नायगाव - सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथिल जवान अमोल रामनाथ झाडे ( २७ )यांना सिक्कीममध्ये आजाराने वीरगती प्राप्त झाली. त्यांच्या निधनामुळे चिंचोली गावावर शोककळा पसरली आहे.

नायगाव - सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथिल जवान अमोल रामनाथ झाडे ( २७ )यांना सिक्कीममध्ये आजाराने वीरगती प्राप्त झाली. त्यांच्या निधनामुळे चिंचोली गावावर शोककळा पसरली आहे. सिक्कीम येथे अमोल झाडे यांचे गुरूवार ( दि.१३ ) निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी चिंचोली येथे दुपारी त्यांच्या मराठा बटालियन मधील सहका-यांकडुन कळाली. त्यांचे पार्थिव सिक्कीम येथुन विमानाने मुंबई येथे आणण्यात आले. तेथून वाहनाने गावी आणण्यात आले. येथील व्ही.एन.नाईक शिक्षण संस्थेच्या प्रांगणात त्यांच्यावर शासकीय इतमामात कोविडचे सर्व नियम पाळून अंतिमसंस्कार करण्यात आले. यावेळी सैन्य दलातील अधिकारी, तहसिलदार राहुल कोताडे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवानेते उदय सांगळे, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे,माजी सरपंच संजय सानप,पोलिस पाटील मोहन सांगळे आदीसह मोजके ग्रामस्थ उपस्थित होते.---------------------१८ व्या वर्षीच सैन्यदलात दाखलअमोल झाडे हे २००८ मध्ये वयाच्या अठराव्या वर्षी सैन्य दलात दाखल झाले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण चिंचोली आणि पुढील शिक्षण सिन्नरमध्ये झाले. झाडे यांना त्यांच्या आई व कंपनीत असलेल्या भावाने मोठ्या मेहनतीने शिकवले होते. आपल्या १३ वर्षाच्या कालावधीत त्यांनी जम्मु,काश्मीर,पठाणकोट व सिक्कीम ( आसाम ) आदी ठिकाणी सैन्य दलात सेवा केली. दोन वर्षानी त्यांची सैन्य दलातील सेवा संपणार होती.

टॅग्स :Nashikनाशिक