शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

वेडात वीर ‘मराठे’ दौडले ‘सात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:53 IST

शिवसेनेत खांदेपालट झाला असला तरी, या परिवर्तनामुळे शिवसेनेतील अस्वस्थता काही कमी झालेली नाही. त्याचे प्रत्यंतर बुधवारी (दि. २८) नवनियुक्त महानगरप्रमुखांनी बोलावलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत आले. प्रभाग १३ च्या पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी महानगरप्रमुख सचिन मराठे व महेश बडवे यांनी बोलावलेल्या बैठकीला ३५ पैकी अवघ्या सात नगरसेवकांनी हजेरी लावल्याचे समजते. नगरसेवकांनी महानगरप्रमुखांनी बोलावलेल्या बैठकीकडे पाठ फिरविल्याने सेनेतील अस्वस्थता आणखी चर्चेत आली आहे.

नाशिक : शिवसेनेत खांदेपालट झाला असला तरी, या परिवर्तनामुळे शिवसेनेतील अस्वस्थता काही कमी झालेली नाही. त्याचे प्रत्यंतर बुधवारी (दि. २८) नवनियुक्त महानगरप्रमुखांनी बोलावलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत आले. प्रभाग १३ च्या पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी महानगरप्रमुख सचिन मराठे व महेश बडवे यांनी बोलावलेल्या बैठकीला ३५ पैकी अवघ्या सात नगरसेवकांनी हजेरी लावल्याचे समजते. नगरसेवकांनी महानगरप्रमुखांनी बोलावलेल्या बैठकीकडे पाठ फिरविल्याने सेनेतील अस्वस्थता आणखी चर्चेत आली आहे. महानगर शिवसेनेत काही दिवसांपूर्वीच फेरबदल करण्यात येऊन महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांना हटवण्यात आले. त्यांच्या जागेवर नाशिक पूर्व आणि पश्चिम मतदारसंघासाठी माजी नगरसेवक सचिन मराठे, तर पंचवटी आणि नाशिकरोड-देवळालीसाठी महेश बडवे यांची महानगरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीनंतर पदग्रहण सोहळ्याला जुन्या शिवसैनिकांचीही हजेरी लागल्याने सेनेत चैतन्याचे वारे संचारल्याचे वातावरण तयार झाले. दरम्यान, प्रभाग १३ मधील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे भाजपाने सर्व नगरसेवकांची बैठक बोलावत बूथनिहाय नियोजन केले असताना, शिवसेनेच्या दोन्ही महानगरप्रमुखांनीही पक्षाच्या सर्वच्या सर्व ३५ नगरसेवकांना पोटनिवडणुकीच्या तयारीसाठी गुरुवारी सकाळी ११ वाजता बोलावलेल्या बैठकीला निमंत्रित केले. परंतु, साडेबारा वाजले तरी नगरसेवकांचा मागमूस दिसेना. त्यामुळे उपस्थित राहिलेल्या सात नगरसेवकांमध्येच बैठकीचा उपचार पार पाडण्यात आल्याचे समजते. बैठक आटोपल्यानंतर दोन नगरसेवकांची भर पडली. ३५ नगरसेवक असूनही अत्यल्प उपस्थिती लावल्याने सेनेतील अस्वस्थता त्यानिमित्ताने चर्चेत आली आहे.सहाणे हकालपट्टीमुळेही गट-तटशिवसेनेचे माजी नगरसेवक व गेल्यावेळचे विधानपरिषदेचे उमेदवार शिवाजी सहाणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर काही ठरावीक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद बोलावत सहाणे यांनी केलेल्या आरोपांचे खंडण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, याबाबत काही पदाधिकाºयांनी सोईस्कररीत्या मौन पाळले. त्यामुळे सहाणे यांच्या हकालपट्टीवरूनही पक्षात गट-तट पडल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना