शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
5
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
6
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
7
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
8
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
9
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
10
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
11
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
12
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
13
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
14
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
15
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
16
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
17
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
18
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
19
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
20
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम

मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी वायुनंदन

By admin | Updated: March 7, 2017 02:31 IST

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ.ई. वायुनंदन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ.ई. वायुनंदन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती डॉ. सी. विद्यासागर राव यांनी सोमवारी डॉ. वायुनंदन यांच्या नियुक्तीचे आदेश काढले. गेल्या दोन महिन्यांपासून कुलगुरु निवडीची प्रक्रिया सुरू होती. कुलगुरुपदासाठी विक्रमी अर्ज आल्याने या निवडीकडे शिक्षणक्षेत्राचे लक्ष लागले होते. बुधवारी वायुनंदन पदभार स्वीकारणार आहेत. डॉ. माणिकराव साळुंखेयांनी १९ आॅगस्ट २०१६ मध्ये मुदतीपूर्वीच कुलगुरूपदाचा राजीनामा दिल्याने कुलगुरूपद रिक्त होते. साळुंखे यांच्या राजीनाम्यामुळे अनेक उलटसुलट चर्चा सुरू होती. दोन महिन्यांपासून नूतन कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू होती. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याकडे मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.  डॉ. वायुनंदन यांनी हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून लोकप्रशासन या विषयात एम.ए.एम.फील तसेच पीएचडी प्राप्त केली असून, उच्च शिक्षण क्षेत्रातील अध्यापन तसेच संशोधनाचा त्यांना व्यापक अनुभव आहे.