शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वावीकरांनी पाळला लॉकडाउन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 23:24 IST

कोरोना विषाणू संसर्गामुळे सर्वत्र जनजीव न भयभीत झाले आहे. मात्र, असे असताना ग्रामस्थांकडून खबरदारी घेतली जात नसून बिनदिक्कतपणे आपले व्यवहार सुरू ठेवण्याला अनेकजण प्राधान्य देत आहेत. त्यामुळे विशेषाधिकाराचा वापर करून कोरोना प्रतिबंधक दक्षता समिती व ग्रामविकास अधिकारी यांच्या सूचनेनुसार बुधवारपासून (दि. १५) वावीकरांनी स्वयंस्फूर्तीने लॉकडाउन पाळण्यास प्रारंभ केला. भाजीपाला विक्रीसह किराणा दुकान बंद ठेवल्यामुळे वावी गावात शुकशुकाट दिसून आला.

ठळक मुद्देखबरदारी : तीन दिवस किराणा, भाजीपाला बंद

सिन्नर : कोरोना विषाणू संसर्गामुळे सर्वत्र जनजीव न भयभीत झाले आहे. मात्र, असे असताना ग्रामस्थांकडून खबरदारी घेतली जात नसून बिनदिक्कतपणे आपले व्यवहार सुरू ठेवण्याला अनेकजण प्राधान्य देत आहेत. त्यामुळे विशेषाधिकाराचा वापर करून कोरोना प्रतिबंधक दक्षता समिती व ग्रामविकास अधिकारी यांच्या सूचनेनुसार बुधवारपासून (दि. १५) वावीकरांनी स्वयंस्फूर्तीने लॉकडाउन पाळण्यास प्रारंभ केला. भाजीपाला विक्रीसह किराणा दुकान बंद ठेवल्यामुळे वावी गावात शुकशुकाट दिसून आला.सकाळी साडेसात वाजेपर्यंत दूध संकलन केंद्रे बंद करण्यात आली. याशिवाय किराणा दुकाने, भाजीपाला विक्री, पीठ गिरणीदेखील बंद ठेवण्यात आल्या. केवळ आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवांशी निगडित आस्थापना सुरू ठेवण्यात आल्या होत्या. ग्रामविकास अधिकारी परेश जाधव यांचेसह गावचे सरपंच नंदा गावडे, उपसरपंच सतीश भुतडा, माजी सरपंच विजय काटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्यासह व्यापारी संघटना प्रतिनिधी यांनी शंभर टक्के लॉकडाउनसाठी परिश्रम घेतले.वावी ग्रामपंचायतीने तीन दिवस १०० टक्के लॉकडाउन पाळण्याचा निर्णय घेतल्यानंतर कोरोना दक्षता समितीने गावात येणारे सर्व अंतर्गत रस्ते बंद केले होते. गावात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर सुमारे ४० स्वयंसेवक खडा पहारा देत होते. प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी केली जात होती. त्याचबरोबर गावातील कोणत्याही व्यक्तीला गावाबाहेर सोडले जात नव्हते. कोरोना दक्षता समितीचे अध्यक्ष विजय काटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ४० स्वयंसेवक कार्यरत होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य