शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांत १३८ पुरुषांवर नसबंदी शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 17:27 IST

कुटुंब नियोजन : दुर्गम भागातील पळसन आरोग्य केंद्रात विक्रमी नोंद

ठळक मुद्दे ‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब’चे महत्व जाणत पुरूष नसबंदी शस्त्रक्रियेला प्रतिसाद

नामपूर : सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या पळसन परिसरातील ग्रामस्थांनी ‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब’चे महत्व जाणत पुरूष नसबंदी शस्त्रक्रियेला प्रतिसाद दिल्याने केंद्राने वर्षभराचे उद्दिष्ट तीन दिवसातच पूर्ण केले आहे. तीन दिवसात १३८ पुरुषांवर नसबंदी शस्त्रक्रिया झाल्याने जिल्ह्यात विक्रमी नोंद झाली आहे.वंशाचा दिवा म्हणून मुलाचा हट्ट न धरता व पारंपरिक स्त्रीयांच्या शस्त्रक्रियेला छेद देत शेकडो पुरूष कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी पुढे आले आहेत. पळसन येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी संवाद कौशल्याने नागरिकांचे मतपरिवर्तन करून ही किमया साधली आहे. पुरूष नसबंदी शस्त्रक्रिया घेऊन नाशिक जिल्ह्यातील १०५ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्व प्रथम कुटुंब कल्याण नियोजनाचे उद्दिष्ट पूर्ण करणारे पळसन आरोग्य केंद्र हे पहिले केंद्र ठरले आहे. सुरगाणा तालुक्यात अतिवृष्टी असतानाही नागरिकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला. यंदा १३८ कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट शासनाने पळसन केंद्रास दिले होते. मात्र तीन शिबिरांमध्ये तीन आठवडयाच्या कालावधीत १३८ कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे उद्दिष्टय पूर्ण करण्यात आले आहे. डॉ. समाधान पाटील यांच्या नेतृत्वाखाली केंद्राने हे उद्दिष्ट यशस्वी पार पाडले. पळसन, बा-हे, मनखेड, पांगारणे,माणी येथील कार्य क्षेत्रातील पुरुषांची शस्त्रक्रिया  पळसन येथे करण्यात आली. मागील वर्षी नाशिक जिल्हा कुटुंब नियोजन कार्यक्र मात महाराष्त प्रथम आला होता. त्यात सुरगाणा तालुक्याचा सिंहाचा वाटा होता.५०० शस्त्रक्रियेचे उद्दिष्टयावर्षी ५०० शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आहे. पळसन येथे यापूर्वी मी काम केलेले आहे, त्यामुळे कार्यक्षेत्राची पुर्ण कल्पना असल्याने तेथील लोकांच्या परिस्थितीची जाणीव आहे. कुटुंब छोटे असले तर आपण प्रगती करू अशी त्यांची भावना आहे. म्हणूनच हे विक्र मी काम येथील सहाय्यक अब्बू शेख व इतर कर्मचा-यांच्या माध्यमातून आम्ही करु शकलो.- डॉ. समाधान पाटील.

टॅग्स :Familyपरिवार