शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

मुलीच्या पंचक्रिया विधीतच जावयावर वस्तऱ्याने हल्ला

By admin | Updated: July 5, 2017 23:40 IST

२५ लाखांची मागणी : गुन्हा दाखल; माहेरच्या आठजणांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : मातृछत्र हरपलेल्या पाच दिवसांच्या नातीला पंचवीस लाख रुपये द्यावेत या मागणीतून लेकीच्या पंचाक्रिया विधीच्या कार्यक्र मातच माहेरवासीयांनी धुडगूस घालून सैन्यदलातील जावयावर वस्तऱ्याने हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी (दि.५) सकाळी ११ वाजेच्या सुमारास सटाणा शहरात घडली. या प्रकरणी सटाणा पोलिसांनी ब्राह्मणपाडा येथील आठ जणांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जखमी जवानाला उपचारासाठी मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.मातृछत्र हरपलेल्या पाच दिवसांच्या चिमुरडीचा चांगल्या प्रकारे सांभाळ व्हावा म्हणून गेल्या चार दिवसांपासून मेघाचे वडील उत्तम वामन चव्हाण (रा. ब्राह्मणपाडा) यांनी नातीसाठी पंचवीस लाख रु पये द्यावेत म्हणून ठाकरे यांच्याकडे तगादा लावला होता. यावरून रक्षा विसर्जनाच्या दिवशीदेखील दोन्ही परिवारामध्ये शाब्दिक चकमक उडाली होती. दरम्यान, आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ठाकरे यांच्या घरासमोर पंचिक्र या विधीचा कार्यक्र म सुरू असताना वडील उत्तम चव्हाण यांच्यासह माहेरवासीयांनी पंचवीस लाख रु पयांची मागणी करून कुरापत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी शाब्दिक बाचाबाचीचे पर्यावसन हाणामारीत होऊन घरातील शोकेसची तोडफोड करून नितीनवर वस्तऱ्याने हल्ला करून जखमी केले. तसेच ठाकरे कुटुंबियांना बेदम मारहाण केली. या हाणामारीमुळे पंचिक्र या विधीचा कार्यक्र म अक्षरश: उधळून लावला. हाणामारीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलीस निरीक्षक बशीर शेख, उपनिरीक्षक कृष्णा घायवट यांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी ठाकरे यांनी सटाणा पोलिसांत तक्र ार दिल्यानंतर उत्तम वामन चव्हाण, बबन उत्तम चव्हाण, भालचंद्र रामभाऊ चव्हाण, गणेश शिवाजी चव्हाण , ताराचंद शिवाजी चव्हाण, संजय डोंगर चव्हाण, शिवाजी वामन चव्हाण, मधुकर भावराव चव्हाण (सर्व, रा. ब्राह्मणपाडा), कारभारी यादव भामरे, रवींद्र यादव भामरे, रामचंद्र महादू शेवाळे (तिघे, रा. आनंदपूर), कापडणीस यांच्यासह तेरा जणांविरु द्ध गुन्हा दाखल करून आठ जणांना अटक करण्यात आली आहे. प्रसूतीदरम्यान झाला मृत्यूशहरातील कृष्णनगर भागात राहणाऱ्या सेवानिवृत्त एस.टी कर्मचारी रामदास भिका ठाकरे यांचा मुलगा नितीन (२८) अंबाला, हरियाणा येथे सैन्यदलात नोकरीला आहे. नितीनची पत्नी मेघा गेल्या ३० जून रोजी प्रसूतीसाठी एका खासगी रु ग्णालयात भरती झाली होती. पहाटे प्रसूती होऊन मेघाला कन्यारत्न झाले. मात्र दुर्दैवाने प्रसूतीदरम्यान प्रचंड प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने मेघाचा मृत्यू झाला.