शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वसंत गितेंच्या नाराजीकडे स्थानिक नेत्यांचे दुर्लक्ष

By admin | Updated: November 5, 2014 00:07 IST

समर्थक नगरसेवकही गप्प : पदाधिकाऱ्यांचे राजीनामासत्र संपुष्टात

नाशिक : ‘वसंत गिते यांनी पदाचा राजीनामा दिलेला आहे, पक्षाचा नाही. आपण त्यांची नाराजी निश्चित दूर करू’ असे सांगून पक्षातील गिते समर्थकांना थोपवून धरण्यात यशस्वी झालेले महापौर व स्थायी समिती सभापतींनी दुसऱ्या दिवशी मात्र गिते यांच्याकडे पाठ फिरवित त्यांची नाराजी दूर करण्याऐवजी यासंदर्भातील निर्णय पक्षप्रमुख राज ठाकरे हेच घेतील असे सांगून हात झटकले आहेत, तर दुसरीकडे पक्षानेही गिते यांच्या नाराजीकडे गांभीर्याने न घेतल्याने त्यांच्या समर्थकांत चुळबुळ सुरू झाली आहे. निवडणुकीचा कोणताही माहौल दृष्टिपथात नसताना वसंत गिते यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा देण्यामागचे गौडबंगाल स्पष्ट होऊ शकले नाही; परंतु त्यांच्या समर्थक नगरसेवकांची संख्या लक्षात घेता, महापालिकेतील मनसेच्या सत्तेला ते धोका पोहोचवू शकतात अशी भीती सत्ताधाऱ्यांना लागून राहिली आहे. त्यामुळे सोमवारी गिते यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर महापौर अशोक मुर्तडक व स्थायी समिती सभापती राहुल ढिकले यांनी तातडीने मनसे नगरसेवकांची बैठक घेऊन शिरगणती केली व त्यांच्यातील नाराजी म्हणजेच वसंत गिते यांच्याविषयीची भावना जाणून घेतली. गिते यांच्या समर्थनार्थ त्र्यंबकेश्वर येथील सात नगरसेवकांनी पक्षाकडे राजीनामा पाठविण्याचे धाडस केले. त्यामानाने नाशिक या गिते यांच्या होमपिचवर एकाही नगरसेवकाने तसे धाडस न केल्याने एक तर गिते यांच्या पाठीशी एकही नगरसेवक नसल्याचा अर्थ काढला जात असून, दुसरीकडे गिते यांची नाराजी काढली जाणारच आहे तर राजीनामा कशासाठी, असा विचार करूनच बहुधा नगरसेवकांनी गप्प राहणे पसंत केल्याची चर्चा पक्षात होत आहे. गिते यांची समजूत काढू असा शब्द नगरसेवकांना देणारे महापौर मुर्तडक व स्थायी समिती सभापती राहुल ढिकले यांनी मात्र दुसऱ्याच दिवशी त्याकडे दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे, गिते यांची सेनेच्या व भाजपाच्या नेत्यांनी भेट घेऊन त्यांना पक्षप्रवेशाची खुली आॅफर दिल्यानंतरही मनसेच्या स्थानिक नेत्यांनी यासंदर्भात पावले न उचलण्याची बाब पक्ष कार्यकर्त्यांना खटकली आहे. चोवीस तासांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही राजीनाम्याची पक्षाच्या नेत्यांनी दखल घेतलेली नसल्याची चर्चा कार्यकर्ते करीत असून, त्यामुळे गिते यांच्या पदाच्या राजीनाम्यानंतर अन्य पक्ष पदाधिकाऱ्यांनी चालविलेले राजीनामा सत्रही आपोआप संपुष्टात आले आहे.