शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

वसंत आबाजी डहाके यांना यंदाचा ‘जनस्थान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 01:36 IST

येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने ज्ञानपीठाच्या धर्तीवर केवळ मराठीतील सृजनशील साहित्यिकासाठी एक वर्षाआड दिला जाणारा ‘जनस्थान’ पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ कवी, कादंबरीकार आणि समीक्षक वसंत आबाजी डहाके यांना घोषित करण्यात आला आहे.

नाशिक : येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने ज्ञानपीठाच्या धर्तीवर केवळ मराठीतील सृजनशील साहित्यिकासाठी एक वर्षाआड दिला जाणारा ‘जनस्थान’ पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ कवी, कादंबरीकार आणि समीक्षक वसंत आबाजी डहाके यांना घोषित करण्यात आला आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी येत्या २७ फेब्रुवारीला प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते सायंकाळी ६ वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.  कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विश्वस्तांनी मंगळवारी (दि. २९) आयोजित पत्रकार परिषदेत ‘जनस्थान’ पुरस्काराची घोषणा केली. एक लाख रुपये, ब्रॉँझची सूर्यमूर्ती आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कवी, कादंबरीकार, समीक्षक आणि चित्रकार म्हणून वसंत आबाजी डहाके यांची ओळख आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरा येथे ३० मार्च १९४२ रोजी जन्मलेल्या डहाके यांनी खासगी व शासकीय महाविद्यालयामध्ये मराठी विषयाचे अध्यापन करतानाच त्यांची वाङ्मयीन कारकीर्द काव्यलेखनापासून बहरली. १९६० साली ‘सत्यकथा’ या मासिकात त्यांची पहिली कविता प्रसिद्ध झाली. ‘योगभ्रष्ट’ या दीर्घ कवितेमुळे ते प्रकाशात आले. १९७२ मध्ये याच नावाने त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्यांचे शुभवर्तमान, शुन:शेप, चित्रलिपी आणि वाचाभंग हे काव्यसंग्रह, सर्वत्र पसरलेली मुळे हे दीर्घ काव्य, मराठी साहित्य : इतिहास आणि संस्कृती हे संशोधित लेखन, यात्रा-अंतर्यात्रा हा ललितलेख, अधोलोक, प्रतिबद्ध आणि मर्त्य या कादंबऱ्या, मालटेकडीवरून हा ललित लेखसंग्रह तसेच मराठीतील कथनरूपे, दृश्यकला आणि साहित्य प्रकाशित झालेले आहेत. मराठीतील कोशवाङ्मयातही त्यांनी मोलाची भर घातली आहे. ‘चित्रलिपी’ या काव्यसंग्रहाकरिता त्यांना २००९ साली साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. याशिवाय विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्कार, कादंबरी व कवितेसाठी महाराष्टÑ शासनाचे पुरस्कार, २००३ मध्ये गंगाधर गाडगीळ पुरस्कार, २००५ मध्ये महाराष्टÑ फाउण्डेशनचा पुरस्कार, २०१० मध्ये मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानच्या वतीने शांता शेळके पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झालेला आहे. चंद्रपूर येथे २०१२ मध्ये भरलेल्या ८५ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. दरम्यान, पत्रकार परिषदेला कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संजय पाटील, कार्यवाह प्रा. मकरंद हिंगणे, माजी उपमहापौर गुरुमित बग्गा, अरविंद ओढेकर, रंजना पाटील, किशोर पाठक आदी विश्वस्त उपस्थित होते.निवड समितीची बैठकपुरस्काराची निवड घोषित करण्यापूर्वी निवड समितीची बैठक झाली. बैठकीला संजय जोशी, सदानंद बोरसे, मोनिका गजेंद्रगडकर, विलास खोले व रेखा इनामदार-साने हे सदस्य उपस्थित होते. यावेळी मराठीतील प्रमुख साहित्यिकांच्या कामगिरीवर सखोल चर्चा होऊन वसंत आबाजी डहाके यांच्या नावावर एकमुखाने शिक्कामोर्तब करण्यात आले.यापूर्वी यांचा झाला गौरवकुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने आजवर विजय तेंडुलकर (१९९१), विंदा करंदीकर (१९९३), इंदिरा संत (१९९५), गंगाधर गाडगीळ (१९९७), व्यंकटेश माडगूळकर (१९९९), श्री. ना. पेंडसे (२००१), मंगेश पाडगावकर (२००३), नारायण सुर्वे (२००५), बाबूराव बागुल (२००७), ना. धों. महानोर (२००९), महेश एलकुंचवार (२०११), भालचंद्र नेमाडे (२०१३), अरुण साधू (२०१५) आणि विजया राजाध्यक्ष (२०१७) यांना जनस्थान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार मला घोषित झाल्याचे समजल्यानंतर खूप छान वाटले, आनंद वाटला. एवढा मोठा पुरस्कार प्राप्त होणे ही आनंददायी घटना आहे. विशेष म्हणजे या पुरस्कारामागे कुसुमाग्रजांचे नाव व प्रेरणा असल्याने त्याचा विशेष अभिमान आहे. आजवर नामवंत मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.- वसंत आबाजी डहाके, ज्येष्ठ साहित्यिक 

टॅग्स :Kusumagrajकुसुमाग्रजNashikनाशिक