शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

वसाका प्राधिकृत मंडळ बरखास्तीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 01:29 IST

वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यास ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादकांचे व पूर्ण क्षमतेने काम करणाºया कामगार व इतर घटकांचे पैसे देण्यासाठी वसाका प्राधिकृत अधिकारी आमदार डॉ. राहुल अहेर व प्राधिकृत मंडळ असमर्थ असून, केवळ प्रतिकूल परिस्थितीचा गैरफायदा घेत असल्याने वसाकाला भविष्य नाही, निश्चित धोरण नसल्याने वसाका उर्जित अवस्थेत येणार नाही त्यामुळे वसाका प्राधिकृत मंडळ बरखास्त करावे व वसाका खासगी उद्योजकांना चालविण्यास द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, राष्ट्रवादी काँग्रेसचे देवळा तालुकाध्यक्ष पंडितराव निकम, वसाका बचाव परिषदेचे निमंत्रक सुनील देवरे, ऊस उत्पादक संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी केली आहे. याबाबत सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील, साखर आयुक्त पुणे यांना निवेदन देण्यात आले आहे.

कळवण : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यास ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादकांचे व पूर्ण क्षमतेने काम करणाºया कामगार व इतर घटकांचे पैसे देण्यासाठी वसाका प्राधिकृत अधिकारी आमदार डॉ. राहुल अहेर व प्राधिकृत मंडळ असमर्थ असून, केवळ प्रतिकूल परिस्थितीचा गैरफायदा घेत असल्याने वसाकाला भविष्य नाही, निश्चित धोरण नसल्याने वसाका उर्जित अवस्थेत येणार नाही त्यामुळे वसाका प्राधिकृत मंडळ बरखास्त करावे व वसाका खासगी उद्योजकांना चालविण्यास द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, राष्ट्रवादी काँग्रेसचे देवळा तालुकाध्यक्ष पंडितराव निकम, वसाका बचाव परिषदेचे निमंत्रक सुनील देवरे, ऊस उत्पादक संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी केली आहे. याबाबत सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील, साखर आयुक्त पुणे यांना निवेदन देण्यात आले आहे.  वसाका कारखान्यास ऊस उत्पादकांनी ऊस पुरवठा केला; मात्र उसाचे पेमेंट मिळत नाही त्यामुळे संतप्त झालेल्या ऊस उत्पादकांनी वसाका कार्यस्थळावर सुरुवातीला दोन तास ठिय्या आंदोलन केले. आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दिलेल्या आश्वासनांची पूर्ती झाली नाही. त्यामुळे वसाका कार्यस्थळावर पुन्हा आंदोलन करण्यात येऊन कुलूप लावण्यात आले; मात्र केलेल्या आंदोलनाने वसाकाचे कोणतेही नुकसान झालेले नसताना न झालेल्या नुकसानीबाबत आमदार डॉ. राहुल अहेर चुकीची माहिती देत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार व सुनील देवरे यांनी यावेळी सांगितले.  प्रतिकूल परिस्थिती असल्याने ऊस उत्पादकांनी वसाकाला ऊस पुरवठा केला. ऊस उत्पादकांना चार महिने झाले तरी उसाचे पेमेंट मिळत नाही त्यामुळे संतप्त झालेल्या ऊस उत्पादकांनी वसाका कार्यस्थळावर दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. आमदार डॉ. राहुल अहेर यांनी ऊस उत्पादकांचे पेमेंट देण्याचे आश्वासन पाळले नाही. केवळ आंदोलन म्हणून ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी वसाकाला कुलूप ठोकले. यात किती व कोणते नुकसान झाले. यापेक्षा आपण कारखाना, ऊस उत्पादक व कामगार यांचे किती नुकसान केले आहे हे आता स्पष्ट झाले असल्याचे गोविंद पगार व सुनील देवरे यांनी यावेळी सांगितले.  कार्यक्षेत्रात ऊस उपलब्ध असतांना कारखाना प्रतिकूल परिस्थितीत असल्याचे दाखवून प्राधिकृत मंडळाकडून उदासीन धोरण स्वीकारले जात आहे. ऊस उत्पादकांचे अर्थकारण धोक्यात आले आहे. आजारी कारखाना यादीत सतत वसाकाचे नाव झळकून आर्थिक कोंडी केली जात असेल तर प्राधिकृत मंडळाची कारखान्यास आवश्यकता नसल्याचे पगार व देवरे म्हणाले.  कारखान्यात १५० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची अनियमितता झाली असतांना प्राधिकृत मंडळ चौकशीची मागणी करीत नसल्याने याप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल करण्यात येणार आहे असे ते म्हणाले.शासन निर्णयजिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरु होण्यापूर्वी शासकीय नियोजन सभेत वसाकाचे प्रतिनिधी उपस्थित नसल्याने ऊस भाव, उसाची उपलब्धता ७०-३० प्रस्ताव, कर्ज उभारणी, स्वतंत्र आय टी विभाग याप्रश्नी कोणतीही कार्यवाही प्रशासनाने न केल्याने अडचणी अधिक वाढल्या. ऊस उत्पादकांचे व कार्यक्षेत्राचे नुकसान झाले. शासन धोरणानुसार व्यवस्थापनाने धोरण स्वीकारणे सक्तीचे करावे अशी मागणी गोविंद पगार व सुनील देवरे यांनी साखर आयुक्तांकडे केली आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने