शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी डॉक्टरांनी घेतले वासा थेरपी प्रशिक्षण

By admin | Updated: January 22, 2017 23:09 IST

वासा थेरपी : मेंदूविकारावरील देशातील पहिले स्वतंत्र केंद्र

सातपूर : आपल्याला एखादे चांगले शिक्षण अथवा प्रशिक्षण हवे असेल तर आपला कल परदेशाकडे असतो. परंतु परदेशातील डॉक्टर्स नाशिकला येऊन प्रशिक्षण घेऊन गेले तर कदाचित पटणार नाही. पण हे खरे आहे. परदेशी पाहुण्यांनी नाशिकमध्ये वासा उपचारपद्धती जाणून घेतली.  सातपूर कॉलनीत मेंदूबाधित  रुग्णांवर वासा थेरपीच्या माध्यमातून मोफत उपचार केले जातात. भारतातील पूर्णवेळ चालविले जाणारे हे एकमेव केंद्र आहे. या थेरपीचा अभ्यास करण्यासाठी परदेशातील डॉक्टरांचे पथक नाशिकमध्ये येऊन प्रशिक्षण घेऊन गेले आहेत. मेंदूबाधित रुग्णांवरील उपचारासाठी भारत आणि परदेशातून असंख्य रुग्ण येथील या केंद्रात येतात. फिनलँड आणि स्विडन या देशातील नऊ डॉक्टरांचे पथक नुकतेच येथे येऊन त्यांनी वासा थेरपीचा अभ्यास केला. या केंद्रात मेंदूबाधित रुग्णांवर कोणत्याही औषधांचा अथवा सर्जरीचा वापर केला जात नाही. जागतिक स्तरावर या उपचार पद्धतीला मान्यता मिळत आहे.  डॉ. राजूल वासा या मूळच्या मुंबईच्या आहेत. डॉ. वासा फिजिओथेरपी तज्ज्ञ आहेत. त्यांनी स्वत:ची उपचार पद्धत शोधून काढली असून, या उपचार पद्धतीला ‘वासा थेरपी’ नाव दिले आहे.  नाशिकचे उद्योजक उमेश राठी आणि डॉ. वासा यांची ओळख होती. नगरसेवक सलीम शेख यांच्या माध्यमातून राठी यांनी सातपूर कॉलनीत वासा सेंटरची स्थापना केली. पूर्ण वेळ उपचार करणारे हे पहिलेच केंद्र आहे. स्विडन आणि फिनलँड देशातील पाच रुग्णांनी दोन महिने उपचार घेतला आहे. गेल्या दीड वर्षाच्या काळात या केंद्रात आतापर्यंत ३५० रुग्णांनी उपचार घेतले आहेत.