शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

गंगाम्हाळुंगीजवळ वर्‍हाडाचा टेम्पो उलटला; १६ गंभीर जखमी

By admin | Updated: May 8, 2014 23:10 IST

नशेबाज चालकाला बेदम चोप

नशेबाज चालकाला बेदम चोपनाशिक : गंगाम्हाळुंगी येथे लग्नसमारंभ आटोपून माघारी येत असलेल्या वर्‍हाडाचा टेम्पो उलटून झालेल्या अपघातात १६ जण गंभीर जखमी झाले़ यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे़ दारूच्या नशेत भरधाव टेम्पो पिटाळणार्‍या चालकामुळेच टेम्पो उलटल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले़ अपघातानंतर वर्‍हाडींसह उपस्थितांनी चालकाला बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले़ या अपघातात सखूबाई ठमके (५५), अशोक मुरलीधर ठमके (१८), भागाबाई मुरलीधर ठमके (३५), वामन सावळीराम ठमके (४५), पार्वतीबाई तोया ठमके (६०), अलका अशोक ठमके (२८), नंदा निवृत्ती ठमके (३४), उत्तम आनंद दिवे (१६), गोरख आनंद दिवे (१८), मोहन शिवराम बेंडक ोळी (१८), रंगनाथ राम ठमके (६५), सुमन रंगनाथ ठमके (६०), समाधान काशीनाथ ठमके (१६), गणेश काळू आचारी (२०), राहुल कोंडाजी ठमके (१२), मोहन कोंडाजी ठमके (१६) सर्व राहणार गणेशगाव त्र्यंबक हे गंभीर जखमी झाले आहेत़ इतर सुमारे आठ ते दहा किरकोळ जखमींना उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले़ याबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार गणेशगाव येथील शंकर संतू ठमके याचा विवाह गंगाम्हाळंुगी येथील अनिता शंकर फ साळे हिच्याशी गंगाम्हाळुंगी गावात दुपारी पार पडला़ लग्नसमारंभानंतर माघारी परतणार्‍या गणेशगाव येथील वर्‍हाडाचा आयसर टेम्पो म्हाळुंगीपासून काही अंतरावर आल्यानंतर अचानक उलटला़ चालक दारू पिऊन टेम्पो चालवत असल्यानेच हा अपघात झाला़ चालकास नागरिकांनी बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले़ एसटीने दिले जीवदान टेम्पो उलटल्यानंतर काही वेळातच पाठीमागून गंगाम्हाळुंगी- नाशिक बस (क्र .एमएच १२, ईएफ -६२२९) आली़ चालक एस़ बी़ सांगळे व वाहक बी़ एऩ वाघमारे यांनी माणुसकी दाखवत अपघातातील सर्व जखमींना नागरिकांच्या सहाय्याने बसमध्ये बसवून घेतले व तत्काळ सदर बस थेट जिल्हा रुग्णालयात नेली़ यामुळे जखमींना वेळीच उपचार मिळाल्याने अनेकांचे प्राण वाचले़ एसटी ऐनवेळी देवाप्रमाणे धावून आल्याची प्रतिक्रिया जखमींनी व्यक्त केली़ महिलेचे प्रसंगावधान अपघातग्रस्त टेम्पोतून किरकोळ जखमी झालेल्या कमल गणपत ठमके या महिलेने अपघातानंतर प्रसंगावधान दाखवत सर्व जखमींना एस़टी़ बसमध्ये चढण्यास व बस जिल्हा रुग्णालयात आल्यानंतर प्रत्येक जखमीला उतरण्यास तसेच जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांना जखमींवर उपचार करताना जखमींना पकडणे, जखमेजवळील कापड बाजूला करून जखम उघडी करून देणे अशी मोठी मदत केली़ प्रत्येक जखमीचे उपचार पूर्ण होईपर्यंत त्या आपुलकीने विचारपूस करत होत्या़ इतक्या मोठ्या अपघातात पुरुष हतबलपणे बसले असताना, कमल ठमके यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे डॉक्टरांनीही कौतुक केले़ फ ोटो क्रमांक - 08पीएचएमए105,106फ ोटो कॅप्शन - गंगाम्हाळुंगी अपघातातील जखमींना जिल्हा रुग्णालयात बसमधून उतरवताना नागरिक़