शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

शत-प्रतिशत ‘युती’चा नाशिक विभागात वरचष्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 02:41 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचे गारुड मागील निवडणुकीप्रमाणेच यंदाही मतदारांवर कायम राहिल्याचे दिसून आले आहे. उत्तर महाराष्टतील सर्वच्या सर्व आठ जागांवर महायुतीने विजय संपादन करत विरोधकांना चीत केले.

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचे गारुड मागील निवडणुकीप्रमाणेच यंदाही मतदारांवर कायम राहिल्याचे दिसून आले आहे. उत्तर महाराष्टतील सर्वच्या सर्व आठ जागांवर महायुतीने विजय संपादन करत विरोधकांना चीत केले. काँग्रेस व राष्टवादीच्या उमेदवारांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.नाशिक मतदारसंघात शिवसेनेने तर दिंडोरी मतदारसंघात भाजपने आपल्याकडची जागा कायम राखत विरोधकांना धोबीपछाड दिली. नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी पुन्हा एकदा भुजबळ नावाला धक्का दिला, तर दिंडोरी मतदारसंघात भाजपच्या डॉ. भारती पवार यांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन करत विरोधकांच्या शिडातील हवा काढून घेतली.अंबड येथील वेअरहाउसमध्ये गुरुवारी (दि. २३) झालेल्या मतमोजणीत नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी राष्टÑवादीचे समीर भुजबळ यांच्यावर मोठ्या मतांच्या फरकाने विजय संपादन केला. मागील निवडणुकीत राष्टÑवादीचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांना पराभूत करत जायंट किलर ठरलेले गोडसे यांनी यंदा समीर भुजबळांचा दणदणीत पराभव करतानाच ४८ वर्षांपूर्वीच्या सलग दोनदा खासदार होण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. १९६७ आणि १९७१ मध्ये भानुदास कवडे यांनी सलग विजयाची नोंद केली होती. गोडसे यांच्या विजयाने ‘नो रिपीट’ यालाही ब्रेक बसला. दिंडोरी मतदारसंघातही भाजपने आपला गड कायम राखला. राष्टÑवादीच्या डॉ. भारती पवार यांनी राष्टवादीचे धनराज महाले यांचा १ लाख ९८ हजार ७७९ इतक्या मताधिक्याने पराभव केला. भारती पवार यांच्या रूपाने जिल्ह्यातून पहिली महिला खासदार निवडून गेली आहे.नंदुरबार मतदारसंघात भाजपच्या डॉ. हीना गावित यांनी कॉँग्रेसचे अ‍ॅड. के.सी. पाडवी यांचा पराभव केला. जळगाव मतदारसंघातून भाजपचे आमदार उन्मेष पाटील यांनी राष्टवादीचे गुलाबराव देवकर यांचा पराभव केला. रावेरमधून भाजपच्या रक्षा खडसे या विजयी झाल्या. नगरला भाजपचे सुजय विखे यांनी संग्राम जगताप यांचा पराभव केला. शिर्डी मतदारसंघातून शिवसेनेचे सदाशिव लोखंडे हे विजयी झाले.भामरे दुसऱ्यांदा विजयीधुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार व केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी कॉँग्रेसचे कुणाल पाटील यांचा २ लाख २२ हजार मतांनी पराभव करत सलग दुसऱ्यांदा विजय मिळविला आहे. माजी आमदार अनिल गोटे यांना केवळ ८ हजार ४१८ मते मिळविता आली.