शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

योग दिनानिमित्त शाळांमध्ये विविध कार्यक्रम

By admin | Updated: June 22, 2017 00:23 IST

नाशिक : जागतिक योग दिनानिमित्त शहरातील विविध शाळांमध्ये योग दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी योगाची प्रात्याक्षिके सादर केली

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जागतिक योग दिनानिमित्त शहरातील विविध शाळांमध्ये योग दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी योगाची प्रात्याक्षिके सादर केली. विविध संस्था, संघटनांतर्फे योग दिन साजरा करण्यात आला.मातोश्री महाविद्यालयात योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी योग शिक्षक हेमा दवे यांनी मार्गदर्शन केले. कुणाल दराडे, डॉ. वर्षा पाटील, डॉ. उदय नाईक, डॉ. जयंत भंगाळे, प्रा. देवीदास दिघे, प्रा. निरंजन भाले, प्रा. श्रीधर खुळे, प्रा. शैलेंद्र शुक्ला, प्रा. आण्णासाहेब तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.धन्वंतरी महाविद्यालयधन्वंतरी फाउंडेशन संचलित धन्वंतरी वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. शीतल देशमुख यांनी योग इतिहास व महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी संस्थेच्या अध्यक्ष सरोज धुमणे पाटील होत्या. तसेच संत जनार्दन स्वामी आश्रमात आयोजित जिल्हास्तरीय योग शिबिरात महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. ग्रामोदय विद्यालयजुने सिडको परिसरातील ग्रामोदय शिक्षण संस्थेच्या ग्रामोदय विद्यालयात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थी शिक्षक यांनी योगासनात सहभाग घेतला. जागतिक योग दिनाचे औचित्य साधून सदाशिवनगर, सिडको येथील महिलांनी योगासने केली. यावेळी अलका पाटणी आणि रत्नप्रभा पोहेकर या योग शिक्षकांनी आपल्या मनोगतात योगाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्व स्पष्ट केले.नवरचना विद्यालयगंगापूररोड येथील नवरचना विद्यालयात प्राथमिक विभागात योग दिन साजरा करण्यात आला. प्रभारी मुख्याध्यापक राजेंद्र गोसावी यांनी योगाविषयी माहिती व आवश्यकता सर्व शिक्षक सहभागी झाले होते.स्वामी विवेकानंद विद्यालयस्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय येथे योगासनांच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. पतंजली महिला योग समिती नाशिक या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष लता शिंदे यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्यासमवेत महिलांनी योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. शिक्षकवृंदानीही सहभाग घेतला. मुख्याध्यापक चौधरी, शिक्षकांनी मान्यवरांना शुभेच्छा दिल्या.अभिनव बालविकास मंदिरइंदिरानगर येथील अभिनव बालविकास मंदिरमध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. योगगुरू माधुरी काळे, रुचिरा जाधव यांनी योगासनांविषयी माहिती सांगितली. याप्रसंगी मुख्याध्यापक राहुल अहेर, गणेश वाघचौरे, शिल्पा उशीर, ज्योती वाघ आदी उपस्थित होते.सामूहिक योग शिबिरास प्रतिसादयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्राच्या सामूहिक योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी योगपंडित पिराजी नरवडे यांनी उपस्थितांकडून शवासन, ताडासन आदी आसने करून घेतली. आसनांचे शास्त्रीय महत्त्व व त्यामुळे होणारे फायदे यांचीही माहिती दिली. याप्रसंगी साधक उपस्थित होते.पंचवटी एज्युकेशन सोसायटीपंचवटी एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांमध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. शाळेच्या पटांगणावर ओमकार, योगासने, सूर्यनमस्कार करण्यात आले. विद्यार्थ्यांना योगदिनाचे महत्त्व सांगण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक शरयू खैरे, प्रतिभा धोपावकर, शिक्षकवृंद उपस्थित होते.श्री छत्रपती विद्यालयसातपूर कॉलनीतील विविध विकास संघटना संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात योगदिनाच्या निमित्ताने आर्ट आॅफ लिव्हिंगचे सदस्य संगीता चव्हाण, अश्विनी पावसे, लतिका बोंबटकर आदींनी योगाची प्रात्यक्षिके करून घेतली. मुख्याध्यापक सुलोचना गांगुर्डे यांनी योगदिनाचे महत्त्व विशद केले.प्रगती विद्यालयअशोकनगर येथील प्रगती विद्यालयात रेणू महाले, कविता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिके करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष भटू वाणी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक राहुल चव्हाण यांनी, स्वागत सचिन देसले यांनी, सूत्रसंचालन ज्योती मेणे यांनी, तर प्रतिभा बागड यांनी आभार मानले.अशोकनगर माध्यमिक विद्यालयअशोकनगर येथील मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित माध्यमिक विद्यालयात योगदिनाच्या निमित्ताने किरण राजे, अरविंद अमृतकर, राधाकांत श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली योगाची प्रात्यक्षिके करून घेतली. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. झेड. एस. भंदुरे उपस्थित होते. मुख्याध्यापक श्रीमती एस. बी. कासारे यांनी प्रास्ताविक केले.मनपा जिजामाता विद्यालयसातपूर कॉलनीतील जिजामाता, मनपा विद्यानिकेतन क्र मांक ८, शाळा क्र. ९५, ९६ व माध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक सीमा निगळ, दीक्षा लोंढे तसेच रामहरी संभेराव उपस्थित होते. यावेळी शांताराम जोशी, प्रशांत चर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली योगाची प्रात्यक्षिके करून घेतली. प्रास्ताविक रोहिदास गोसावी यांनी, मुख्याध्यापक नितीन देशमुख, मुख्याध्यापक आशा भोई यांनी मनोगत, सूत्रसंचालन सुरेश खांडबहाले यांनी, तर सचिन चिखले यांनी आभार मानले.