शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

भगूर येथे सावरकर जयंतीनिमित्त विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:33 IST

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर याची जयंती भगूर गावामध्ये विविध उपक्रमांद्वारे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सोमवारी दिवसभर सावरकरप्रेमींनी सावरकर स्मारकात पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती.

भगूर : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर याची जयंती भगूर गावामध्ये विविध उपक्रमांद्वारे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सोमवारी दिवसभर सावरकरप्रेमींनी सावरकर स्मारकात पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती.सावरकर जयंतीनिमित्त सोमवारी सकाळी ७ वाजता सावरकर स्मारकात पुरातन विभागाचे संचालक विलास वाहाणे, तंत्रसहायक जया वाहाणे, जतन सहायक, बालराव पांडे, उप अवेक्षक विजय धुमाळ, व्यवस्थापक सचिन कुलकर्णी, शरद चौधरी यांनी पुतळ्याची विधीवत पुजा केली. महाराष्ट्र नवनिर्माण व विद्यार्थी सेनेच्या वतीने डॉ. प्रदीप पवार, अशोक मुर्तडक, राहुल ढिकले, रतनकुमार इचम, सुमित चव्हाण, कैलास भोर, श्याम देशमुख आदींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी स्मारकात दर्शन घेऊन पूजन केले. भगूर नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष अनिता करंजकर, उपनगराध्यक्ष प्रतिभा घुमरे, नगरसेवक दीपक बलकवडे, पंकज कलंत्री, सुरेश वालझाडे, जयश्री देशमुख, कविता यादव, अनिता ढगे, अश्विनी साळवे आदीनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाचे वतीने सावरकरप्रेमींना भगूर दर्शन अभ्यास उपक्रमाद्वारे सावरकरांचे भगूरमधील वास्तव्य, माहिती, बालपण, मित्रांची माहिती देण्यासाठी सावरकर स्मारक, लक्ष्मी नारायण मंदिर, राममंदिर, शाळा, खंडेराव मंदिरातील अष्टभुजा देवी आदीची माहिती मनोज कुवर, नीलेश हासे, प्रमोद आंबेकर, प्रशांत लोया, योगेश बुरके, पवन आंबेकर यांनी दिली.विविध मंडळबारा बलुतेदार अठरा पगडजाती संघटना प्रेस कामगार मंडळ, जेष्ठ नागरिक संघ, आठवडे बाजार मित्रमंडळ, भाजपा, शिवसेना आदींनी सावरकर स्मारकात पुतळ्याचे पूजन केले. यावेळी दादासाहेब देशमुख, अंबादास कस्तुरे, मृत्युंजय कापसे एकनाथ शेटे, विलास भवार उपस्थित होते.  सावरकर जयंती उत्सव समितीच्या वतीने शिवाजी चौकात डॉ. किरण वाटारे यांचे व्याख्यान झाले. त्यानंतर गायक मंगेश चव्हाण व सहकारी कलाकारांच्या पथकाने समूहनृत्य व गीत सादर केले. यावेळी अभिनेता नागेश मोरवेकर, धनश्री दळवी, जयंती उत्सव अध्यक्ष तानाजी करंजकर, पोलीस निरीक्षक शेखर बागडे, मुकुंद देशमुख, रमेश पवार, प्रताप पवार, प्रशांत कापसे आदी उपस्थित होते.नाशिकरोड परिसरात प्रतिमापूजननाशिकरोड परिसरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी व मित्रमेळा परिवारतर्फे सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन प्रभाग सभापती पंडित आवारे, नगरसेविका सुमन सातभाई, राजेंद्र ताजणे, भाजयुमो मोर्चा अध्यक्ष शांताराम घंटे आदींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नंदू हांडे, सुभाष घिया, रमेश पाळदे, शंकर साडे, दत्ता आगळे, भाईजान चव्हाण, संदीप निकम, देवेंद्र भोळे, जगन टिळे, अरूण सातभाई, जगन्नाथ सरोदे, पप्पू निकम, सुरेश शखेरे, आमोल चोपडे, अरूण निरगुडे, दौलत शिंदे, नामदेव टिळे, किशोर कानडे आदी उपस्थित होते. सिन्नरफाटा येथील पत्रकारयोगी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर अंबादास शिंदे, सतीश बागुल, ग्रंथपाल कल्पना वराडे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर