शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक शहरात महिला दिनानिमित्त विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:56 IST

शहरातील विविध संस्था संघटनांच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक महिला दिनानिमित्त दि.८रोजी सकाळी १० वाजता सुंदरबन कॉलनी, भुजबळ फार्म शेजारील मातृनर्सिंग होमच्यावतीने महिलांसाठी गर्भाशय मुख कॅन्सर तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

नाशिक : शहरातील विविध संस्था संघटनांच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.जागतिक महिला दिनानिमित्त दि.८रोजी सकाळी १० वाजता सुंदरबन कॉलनी, भुजबळ फार्म शेजारील मातृनर्सिंग होमच्यावतीने महिलांसाठी गर्भाशय मुख कॅन्सर तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहान डॉ. प्रेमराज खैरनार, डॉ.विद्या खैरनार यांनी केले आहे. जागतिक महिलादिनानिमित्त बी. के. एज्युकेशनल अ‍ॅण्ड वेल्फेअर सोसायटी अंतर्गत ५ ते ७ मार्च दरम्यान मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मधुबन कॉलनीतील अमृतगंगा गार्डनमध्ये आयोजित या शिबिरात सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यान, साधना, ओमकार, असा योगाभ्यास शिकविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे किशोर येलमामे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.आम्ही साºयाजणी तर्फे परिसंवादआम्ही साºयाजणी या संस्थेच्यावतीने बुधवार (दि.७) दुपारी ४ वाजता गंगापूररोडवरील जुना गंगापूर नाका नजिक शंकराचार्य संकुल, येथे सोशल मिडीया एक भीषण वास्तव याला जबाबदार कोण या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यात ज्येष्ठ पत्रकार विश्वार देवकर, आमदार सिमा हिरे, प्रा. स्वाती पाचपांडे, पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा प्राचार्य सरिता औरंगाबादकर आदि सहभागी होणार आहेत. अशी माहिती संस्थेच्या अध्यक्ष संजिवनी कुलकर्णी यांनी दिली.सुनहरी यादे कार्यक्रमगुरूवार (दि.८) सकाळी १०वाजता मध्यवर्ती कारागृहात बागेश्री निर्मित सुनहरी यादे हा मराठी हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मिनाक्षी वाळवेकर,श्रया गायकवाड,मेनका सुगंधी या गायकांसह कारागृहातील काही महिला बंदीवान आपली गायन कला सादर करनार आहेत. अशी माहिती बागेश्रीचे संचालक चासदत्त दिक्षीत यांनी दिली.

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८