येवला : शहरातील श्रीगुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी मुक्तानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रतिज्ञा लेखन स्पर्धा अभिरूप पद्धतीने (ऑनलाईन पद्धतीने) घेण्यात आली. कविसंमेलनातील विजेत्यांचा पण यावेळी सन्मान करण्यात आला. ध्वजारोहण व ध्वजवंदन प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुनेत्रा पैंजणे यांच्या हस्ते झाले. कोरोना योद्धा म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉ. अमृतसा पहिलवान, सेक्रेटरी दीपक गायकवाड, संचालक संजय नागडेकर, सुधांशू खानापुरे, शशिकला फणसे यांचा सन्मान शिक्षणाधिकारी राजेंद्र चिंचले, प्राचार्य मुरलीधर पहिलवान, डॉ. धनराज गोस्वामी, किरण जाधव, उपप्राचार्य अंबादास ढोले, गजेंद्र धिवर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉ. पहिलवान, गायकवाड यांचे भाषण झाले.
कविसंमेलनातील विजेते सृष्टी जाधव, प्रेरणा दुमणे, प्राप्ती माळोकर, सिद्धी काळे, जयदीप माळोकर, व्यंकटेश पहिलवान, प्रसाद कुलकर्णी, तसेच वरिष्ठ गटातील विजेते कोमल पवार, रिद्धी बंकापुरे, प्राची बनछोड, अनंत कुलकर्णी, अमित अलगट, मंथन पहिलवान, प्रतिज्ञा लेखन स्पर्धेतील विजेते वैभव गारे, तृप्ती चव्हाण, मानसी भावसार, मंधन पहिलवान, तनु बैरागी, सुजित मोरे, सिद्धी शिंदे, निशा सोनार, प्रवीण प्रजापत, सृष्टी बोरकर, मंथन भोरकडे, वरिष्ठ गटातील विजेते श्रेया गिरासे, सार्थक पवार, स्नेहल पवार, आदित्य कुंवर, शिवानी सुरासे, श्रद्धा कोटमे, पूर्वा येलमामे, भक्ति कोटमे, समृद्धी सांबर, प्राची जगदाळे, ओमकार बागुल यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.
कोमल पवार हिने कविता आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त पोवाडा सादर केला.
(१६ येवला स्कूल)
160821\16nsk_43_16082021_13.jpg
विजेत्या विद्यार्थ्याना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.