नाशिक : जाखोरी येथे बुधवारी (दि.१) कृषिदिनानिमित्त कृषी दिंडी व शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.जाखोरी येथे कृषी दिंडी व कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती, असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रयोगशील शेतकरी विश्वास कळमकर होते. सहायक कृषी अधिकारी रणजित आंधळे यांनी विविध कृषी योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.राज्याचे माजी मुख्यमंत्री (कै.) वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने महापालिकेच्या मुख्यालयात अभिवादन करण्यात आले. सभागृह नेते सतीश सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. नितीन गंभिरे, मोहन ठाकरे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.या यावेळी सोपान जगळे, नवनाथ खाडे, संजय धात्रक, गणपत जाधव, रमेश खाडे, ज्ञानेश्वर जगळे, नितीन कळमकर, ज्ञानेश्वर खाडे, बाळू नागरे, अशोक धात्रक, सुनील बोराडे, रतन कळमकर आदी उपस्थित होते. देवीदास राजपुत यांनी सूत्रसंचालन केले.
कृषी दिनानिमित्त शहरात दिंडीसह विविध उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 00:28 IST