शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वरसविहीर ग्रामस्थ पितात जंतुमिश्रित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 18:28 IST

दुषित विहीर : ग्रामपंचायतीचा रामभरोसे कारभार

ठळक मुद्देग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या रामभरोसे कारभारावर ठेवले बोट

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसविहीर गावात पिण्याच्या पाण्याचा बाका प्रसंग उभा ठाकला असून गावाला पाणी पुरवठा करणाऱ्यात विहिरीत जंतु आढळून आल्याने ग्रामस्थांबरोबरच प्रशासनाचेही धाबे दणाणले आहे. अधिकाऱ्यांनी गावाकडे धाव घेत विहिरीची पाहणी केली असता, पाण्यात मोठ्या प्रमाणावर जंतू आढळून आल्याने पाणी पिण्यास अयोग्य बनले आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या रामभरोसे कारभारावर बोट ठेवले आहे.गावाला पाणीपुरवठा करणाºया विहीरीतील पाण्यात जंतु आढळून आल्याचे कळताच होताच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विनायक माळेकर ,सभापती मोतीराम दिवे यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश मोरे, विस्तार अधिकारी राजेंद्र पाटील यांच्यासह गावाकडे धाव घेत विहीरीची पाहणी केली. यावेळी लोकप्रतिनिधींनी ग्रामसेवक डि.जे साबळे यांना धारेवर धरले. विहिरीकडे पूर्णत: दुर्लक्ष झाल्यानेही जाब विचारण्यात आला परंतु, गेल्या दोन वर्षांत चार ग्रामसेवक बदलून गेले असतांना सध्या स्थितीत काम करत असलेल्या ग्रामसेवकांना संपुर्ण चार्ज दिला गेलेलाच नसल्याचे समोर आले. त्यात चौदावा वित्त आयोग व पेसा निधीतून लाखो रूपये खर्च करुनही गावात कामे अपुर्ण असतांना ग्रामसेवकांच्या बदल्या झाल्याच कशा, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला. दरम्यान, लोकप्रतिनिधींनी ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली असता, कार्यालयातील महापुरुषांचे फोटो एका कपाटात ठेवून दिल्याचे निदर्शनास आल्यानेही सभापती मोतीराम दिवे यांनी संबंधितांची कानउघाडणी केली.

टॅग्स :Nashikनाशिक