शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

विंचूर-प्रकाशा महामार्ग दुरुस्तीचे काम निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 15:44 IST

नागरिकांची तक्रार : खड्डयांमुळे वाहनचालक त्रस्त

ठळक मुद्देसंबंधित टोल कंपनीमार्फत रस्ता दुरूस्तीचे काम सुरू

देवळा : देवळा येथे विंचूर - प्रकाशा महामार्गावर पावसामुळे खड्डे पडल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली संबंधित टोल कंपनीमार्फत रस्ता दुरूस्तीचे काम सुरू आहे. परंतु सदरचे काम करताना दर्जा राखला जात नसल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे.भावडघाटात असलेल्या टोल कंपनीच्या अखत्यारीत विंचूर प्रकाशा महामार्ग येतो. देवळा शहरातून जाणाऱ्या ह्या मार्गावर देवळा पोलिस ठाणे,पाचकंदील, स्टेट बँक परीसरात रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. वाहनचालकांना ह्या रस्त्याने जातांना कसरत करावी लागत असल्यामुळे चालक त्रस्त झाले आहेत. टोल कंपनीने ह्या रस्त्यावरील खड्डे दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. परंतु यासाठी वापरली जाणारी खडी व ग्रीट निकृष्ट दर्जाची व ओली असल्यामुळे त्यावर डांबर टाकल्यानंतर ती एकजीव होत नाही. शासकीय निकषानुसार सदर दुरूस्ती होत नसल्याने खडी लवकरच उखडून खड्डे परत ‘जैसे थे’ होणार आहेत. ह्या कामावर सार्वजनिक बांधकाम विभाग मालेगाव उपविभागाचे नियंत्रण व काम योग्य पद्धतीने करून घ्यावयाची जबाबदारी आहे. परंतु ह्या विभागाचा शाखा अभियंता इकडे फिरकलेला नाही.

टॅग्स :Nashikनाशिकroad safetyरस्ते सुरक्षा