शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

विंचूरला एसटीची दुकानाला धडक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 12:35 IST

विंचूर : येवल्याहुन नाशिककडे जाणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची येवला आगाराची बस दुभाजक सोडून विरुद्ध दिशेला एका पंचर काढण्याच्या दुकानात शिरली.

विंचूर : येवल्याहुन नाशिककडे जाणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची येवला आगाराची बस दुभाजक सोडून विरुद्ध दिशेला एका पंचर काढण्याच्या दुकानात शिरली. बसमधील प्रवाशांना किरकोळ जखमा वगळता सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास येवल्याहुन नाशिककडे जाणारी बस (एम एच १४ बी.टी.३०३२ ) येथील हॉटेल किनाऱ्याजवळ आली असता दुभाजकावरु न विरुद्ध दिशेने जात एका दुकानात शिरली. बसमध्ये जवळपास पंधरा प्रवासी होते. टायर पंचर दुकानात बस शिरल्याने प्रवाशांमध्ये एकच तारांबळ उडाली. दुकानाची पत्र्याची शेड संपूर्ण उद्ध्वस्त झाली असून दुकानातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. ग्रामपालिका सदस्य निरज भट्टड, महेंद्र पुंड, अनिल विंचुरकर यांसह स्थानिकांनी मदत कार्य केले.नशीब बलवत्तर होते म्हणून दुकानातील गोलू मन्सुरी हा युवक वाचला. अवघ्या एक मिनिटापूर्वी झोपेतून उठून तो पाणी आणण्यासाठी बाहेर गेला असता काही पावलांवरच दुकानात बस शिरत असल्याचे त्याने बघितले. मात्र सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. दुकानातील साहित्य अक्षरश चक्काचूर झाले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक