शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हॅलेंटाइन डे’ चे सेलिब्रेशन गुलाबासह आइस्क्रीम अन् गिफ्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 01:16 IST

नाशिक : एकमेकांप्रती असणारे प्रेम, जिव्हाळा व्यक्त करीत तरुणाईसह ‘प्रेम’ भावनेवर मनापासून प्रेम करणाºया आबालवृद्धांनी बुधवारी (दि.१४) व्हॅलेंटाइन डे आपल्या खास नियोजनाप्रमाणे उत्साहात साजरा केला. आपल्या प्रिय व्यक्तींना भेटवस्तू देत नात्याची वीण घट्ट करण्याचा प्रयत्न झाला.

ठळक मुद्देप्रिय व्यक्तींना भेटवस्तू देत नात्याची वीण घट्ट करण्याचा प्रयत्न प्रिय व्यक्तींना भेटवस्तू देत नात्याची वीण घट्ट करण्याचा प्रयत्न

नाशिक : एकमेकांप्रती असणारे प्रेम, जिव्हाळा व्यक्त करीत तरुणाईसह ‘प्रेम’ भावनेवर मनापासून प्रेम करणाºया आबालवृद्धांनी बुधवारी (दि.१४) व्हॅलेंटाइन डे आपल्या खास नियोजनाप्रमाणे उत्साहात साजरा केला. आपल्या प्रिय व्यक्तींना भेटवस्तू देत नात्याची वीण घट्ट करण्याचा प्रयत्न झाला.महाशिवरात्रीनंतर बुधवारचा दिवस खास होता. मात्र सकाळपासूनच हवेत निर्माण झालेला गारवा, थंडी, सूर्यदर्शन न झाल्याने अंधारलेले वातावरण यामुळे काहीशी शांतता पहायला मिळत होती. मात्र सकाळी १० नंतर कॉलेजरोड, गंगापूररोडचा परिसर तरुणाईने फुलला होता. यावर्षी व्हॅलेंटाइन डे रविवारी न आल्याने युवक-युवतींनी महाविद्यालयांमध्ये नियमित हजेरी लावली. एरवी कॉलेजच्या नावावर इतरत्रच भटकंती करणाºया तरुणाईने व्हॅलेंटाइन डे च्या मुहूर्तावर महाविद्यालय परिसरात आवर्जून हजेरी लावली होती.जवळपासच्या पर्यटनस्थळांवर सेल्फीचा आनंद घेत, प्रियजनांना निरनिराळ्या आकर्षक भेटी देत व्हॅलेंटाइन डेच्या सेलिब्रेशनला सुरुवात झाली होती. काहींनी सिनेमा, हॉटेलिंग, काहींनी शॉपिंग तर काहींनी जिवलगांशी भरभरून गप्पा मारत हा दिवस साजरा केला. गुलाबाची फुले आणि गुलाबी फुगेतरुणाईच्या उत्साहाला उधाण आले आणि मित्र-मैत्रिणींकडे ‘रेड रोझ’ देत प्रस्ताव मांडला. गुलाबाच्या फुलांबरोबर लाल, गुलाबी रंगांतील फुग्यांचेही अदानप्रदान करण्यात आले. प्रेम संदेशाचे प्रतीक असलेले फुगे आणि फुलांना चांगलाच रंग चढला होता.रेड रोझ वीस रुपयेव्हॅलेंटाइन डे निमित्त गुलाबाच्या फुलाला वाढती मागणी होती. मात्र बाजारात गुलाबाच्या फुलांची प्रचंड आवक झाल्याने भाव कोसळले होते. मात्र कॉलेजरोड परिसरात गुलाबाच्या एका फुलाची किंमत प्रत्येकी वीस ते पंचवीस रुपयांपर्यंत होती. गुलाब हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. यामुळे प्रियकर-प्रेयसींनी गुलाबाच्या फुलाचे दर कमी असो वा जास्त असो, याची कोणतीही काळजी न करता एकमेकांना गुलाबाचे फूल देत आपल्या भावना व्यक्त केल्या.