प्रभाग ३ : नागरीक संतप्तपंचवटी : दिंडोरीरोडवरील प्रभाग क्रमांक ३ मधील वज्रेश्वरीनगर येथे महापालिकेने नागरीकांसाठी सुलभ शौचालयाची निर्मिती केली असली तरी सुलभची दैनिय अवस्था झाल्याने नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे. सुलभची वेळोवेळी स्वच्छता होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरल्याची तक्रार नागरीकांनी केली आहे. विशेष म्हणजे सुलभच्या दुरवस्थेबाबत प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रार करून देखिल संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी दुर्लक्ष केल्याची तक्रार कुंभारकर यांनी केली आहे. याठिकाणी महिला व पुरूषांसाठी अकरा शिटचे सुलभ असुन त्यापैकी एक एकच शिट व्यवस्थित आहे. तसेच गेल्या महिन्याभरापासून सुलभ चोकोप झाल्याने दुर्गंधी पसरलेली आहे. त्यातच काहींचे दरवाजे तुटलेले असल्याने महिलावर्गाची गैरसोय निर्माण होत आहे. महापालिकेने सुलभ ठेकेदारी पद्धतीने दिलेले असले तरी त्याची व्यवस्थित साफसफाई केली जात नसल्याने नागरीकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. सुलभची दुरवस्था झाल्याने नागरीकांना उघडयावरच प्रातविर्धीसाठी बसावे लागत असल्याची तक्रार नागरीकांनी केली आहे. (वार्ताहर) इन्फो बॉक्सप्रशासन सुस्तवज्रेश्वरी नगरातील सुलभची दुरवस्था झाल्याबाबत गेल्या महिन्याभरापुर्वीच प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र संबंधित अधिकारी भेट देतो, कर्मचारी पाठवितो असे म्हणून वेळ मारून देत आहे. झोपडपीचा परिसर असल्याने याभागात रोगराई तत्काळ पसरते त्यातच पावसाळा सुरू झाल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असुन प्रशासनाने वेळीच दखल घेतली पाहिजे. रूचि कुंभारकर, नगरसेवक मनसे,
वज्रेश्वरीनगर सुलभची दुरवस्था
By admin | Updated: May 30, 2014 01:05 IST