शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वैरागकर यांच्या स्वरातून निथळले भावभक्तीचे चांदणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 00:20 IST

दीपावलीच्या उत्सवी आणि आनंदमयी वातावरणात सूरविश्वासची मैफल रसिकांच्या जीवनात चैतन्य निर्माण करून गेली. पंडित शंकरराव वैरागकर यांच्या स्वरातून निथळणारे ‘चांदणे सोबत घेऊन’ या पर्वाची आठवण सर्वांनी जपून ठेवली.

नाशिक : दीपावलीच्या उत्सवी आणि आनंदमयी वातावरणात सूरविश्वासची मैफल रसिकांच्या जीवनात चैतन्य निर्माण करून गेली. पंडित शंकरराव वैरागकर यांच्या स्वरातून निथळणारे ‘चांदणे सोबत घेऊन’ या पर्वाची आठवण सर्वांनी जपून ठेवली.कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यमाने डिझास्टर मॅनेजमेंट हब,सावरकरनगर, येथे सुरविश्वास या कार्यक्र माचे नववे पुष्प शनिवारी (दि.२६) पंडित वैरागकर यांनी गुंफले. मैफलीची सुरु वात रागभैरव रागाने केली विलंबित बडा ख्यालचे शब्द होते, ‘ बलमवा मोरे सैय्या ’, त्यानंतर छोटा ख्याल सादर केला. एक तालात हर हर महादेव यातून परमेश्वराची आराधना करत भावभक्तीचे दर्शन घडले. यानंतर ठुमरी सादर केली. मैफलीचा समारोप वैकुंठीचा राया या भैरवीने झाला. ओंकार वैरागकर (तबला), सागर कुलकर्णी (संवादिनी), अथर्व वैरागकर, ईश्वरी वैरागकर (स्वरसाथ) प्रसाद शेळके (पखवाज) अन्नपूर्णा सौंदाने (टाळ) यांनी साथसंगत केली कार्यक्र माचे सूत्रसंचालन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले.कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. त्यात अ‍ॅड. अविनाश भिडे, कवी संजय चौधरी, तन्वी अमित यांचा सन्माने करण्यात आला. कलावंतांचा सन्मान रमेश देशमुख, डॉ. मनोज शिंपी, सतीश गायधनी, शिल्पा कवीश्वर विनायक देवधर, मिलिंद धटिंगण, माधुरी कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्र माचे आयोजक विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर, विनायक रानडे आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक