शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

दोन तपांपासून ‘रेडक्रॉस’ने घेतलाय लसीकरणाचा वसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:45 IST

रोगप्रतिकारक शक्ती विकसित होईपर्यंत नवजात बालकांना विविध आजारांचा धोका असतो. त्यामुळे माता-बालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. नवजात बालक व त्यांच्या मातांना वेळोवेळी लसीकरण दिल्यास विविध आजारांपासून प्रतिबंध होऊ शकतो आणि ते सुदृढ निरामय राहू शकतात, ही बाब लक्षात घेऊन इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या नाशिक शाखेने मागील दोन तपांपासून लसीकरणाचे व्रत यशस्वीपणे स्वीकारले आहे.

नाशिक : रोगप्रतिकारक शक्ती विकसित होईपर्यंत नवजात बालकांना विविध आजारांचा धोका असतो. त्यामुळे माता-बालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. नवजात बालक व त्यांच्या मातांना वेळोवेळी लसीकरण दिल्यास विविध आजारांपासून प्रतिबंध होऊ शकतो आणि ते सुदृढ निरामय राहू शकतात, ही बाब लक्षात घेऊन इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या नाशिक शाखेने मागील दोन तपांपासून लसीकरणाचे व्रत यशस्वीपणे स्वीकारले आहे.मानवजातीची सेवा या उद्देशाने इंडियन रेडक्रॉस सोसायटीची शहरामधील शाखा कार्यरत आहे. माता, बालकांसह महिला, वृद्ध व तारुण्यात पदार्पण करणाऱ्या युवतींना आवश्यक ते सर्व लसीकरण या शाखेमार्फत पुरविले जाते. सरकारी योजनांतर्गत बहुतांश आजारांना प्रतिबंध घालणारे लसीकरण या शाखेतून मोफत उपलब्ध केले जातात. महिलांच्या आजारांशी संबंधित लसीकरणही रेडक्रॉसमधून केले जाते. शनिवार हा लसीकरणाचा दिवस रेडक्रॉसने निश्चित केला आहे. लसीकरणासाठी माता-बालक उपक्रमात डॉ. प्रतिभा औंधकर व बालरोग तज्ज्ञ डॉ. नितीन बिर्ला सेवा देत आहेत. केवळ शहरामधील नव्हे तर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून माता-बालक लसीकरणासाठी दर शनिवारी रविवार कारंजा येथील रेडक्रॉसच्या दवाखान्यात हजेरी लावतात. एकूणच जिल्हाभरातील रुग्णांची सेवा रेडक्रॉसकडून केली जात आहे. केवळ लसीकरणापुरते मर्यादित न राहता इंडियन रेडक्रॉस सोसायटीने काळानुरूप वैद्यकीय सेवेच्या दिशेने पुढचे पाऊल टाकत आरोग्यसेवेचे व्रत जोपासले आहे. केवळ प्रथमोपचारापुरतेच मर्यादित न राहता नाममात्र दरात फिजिओथेरपी, दंतचिकित्सा, नेत्रचिकित्सा उपचार पद्धतीही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना त्याचा अधिक फायदा होत आहे.वैद्यकीय व्यवसायाच्या स्पर्धेत रेडक्रॉसची आरोग्यसेवास्पर्धेच्या युगात वैद्यकीय व्यवसायामध्येही तीव्र स्पर्धा वाढीस लागल्याचे चित्र आहे. यामुळे दंत व नेत्रचिकित्सा आणि उपचार पद्धतीदेखील महागली असून, सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला दंत व नेत्राच्या आजाराबाबत उपचार करून घेणे शक्य होत नाही. सदर बाब लक्षात घेऊन दोन वर्षांपूर्वी रेडक्रॉसच्या नाशिक शाखेने नाममात्र दरात फिजिओथेरपी केंद्रासह दंत व नेत्रचिकित्सा केंद्रही सुरू केले आहे. दररोज सकाळी दहा ते दुपारी एक वाजेच्या दरम्यान या केंद्रांवर शेकडो गरीब रुग्ण उपचार घेताना दिसून येतात. सामाजिक बांधिलकीमधून वैद्यकीय सेवेचे व्रत स्वीकारणाºया रेडक्रॉस सोसायटीने काळानुरूप आपल्या कार्यप्रणालीमध्ये बदल करत नावीन्यपूर्ण आरोग्यसेवेचा ध्यास कायम ठेवला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक