शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गोंदे दुमालात पोलीस बंदोबस्तात लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:11 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गोंदे दुमाला येथील आरोग्य उपकेंद्रात लसीकरणासाठी बुधवारी सकळापासूनच नागरिकांची झुंबड ...

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गोंदे दुमाला येथील आरोग्य उपकेंद्रात लसीकरणासाठी बुधवारी सकळापासूनच नागरिकांची झुंबड उडाल्यानंतर सरपंचांनी पोलिसांची मदत घेत गर्दीवर नियंत्रण मिळविले. येथे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.

गोंदे दुमाला येथे १८ वर्षांवरील नागरिकांना, तसेच पहिला डोस घेऊन ८४ दिवस संपून दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांसाठी लसीकरण करण्यात येणार असल्याचे चार ते पाच दिवसांपूर्वी सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर सकाळी ९ वाजेपासून नागरिकांनी गर्दी केली होती. आरोग्य विभागाचे कर्मचारी व ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी सरपंच शरद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गर्दी आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले; परंतु नागरिकांची तासातासाला गर्दी वाढतच होती. यामुळे या ठिकाणाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाल्यामुळे ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी व आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांना समजावत शांत केले. येथे उपस्थित असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचेदेखील नागरिक ऐकत नसल्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. या पार्श्वभूमीवर सरपंच शरद सोनवणे यांनी गर्दी हटवण्यासाठी वाडी वऱ्हे पोलिसांची मदत घेतली. पोलीस कर्मचाऱ्यांनी सर्व नागरिकांना बाहेर काढत एकाच रांगेत उभे राहून नंबर आल्यानंतर लस घेण्यास सांगितले. तेव्हा कुठे गर्दी कमी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

याप्रसंगी राजू जाधव, डाॅ. गवई, वाघ, सपकाळ, राऊन, आरोग्यसेविका मेदडे, मनीष जंजाड, राजाराम भोईर, दीपक सैंदाणे, रूपेश पहाडी, तसेच सर्व स्थानिक आशासेविका, आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.

--------------

आरोग्य कर्मचाऱ्यांवर ताण

गोंदे दुमाला येथे लसीकरणासाठी आलेल्या गर्दीमुळे आरोग्य कर्मचारी, आरोग्यसेविका, आशासेविका यांच्यावर ताण निर्माण झाल्यामुळे बेलगाव कुऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. घनश्याम बांबळे यांनी उपकेंद्रावर दाखल होत उपलब्ध लसींबाबत माहिती देत नियोजन करत लसीकरणाला सुरुवात केली. यावेळी आशासेविका श्रीमती मेदडे व आशासेविकांनी सुरुवातीस नागरिकांना मास्क लावून रांगेत शांततेत उभे राहण्याची विनंती केली; परंतु यावेळी नागरिकांची संख्याच इतकी होती की, लसीची संख्या त्या तुलनेत अत्यंत कमी असल्यामुळे नागरिकांनी गर्दी केली होती. यामध्ये अनेकांनी तोंडाला मास्क न लावताच रांगेत उभे राहणे, ठरावीक अंतर न ठेवता जवळच उभे राहणे, यामुळे गोंदे दुमाला येथील या आरोग्य उपकेंद्रावर फज्जा उडाल्यामुळे

--------------------------

गोंदे दुमाला येथील आरोग्य उपकेंद्रासमोर लसीकरणासाठी नागरिकांनी केलेली गर्दी. (१४ नांदूरवैद्य १/२)

140721\14nsk_3_14072021_13.jpg

१४ नांदुरवैद्य १