निफाड तालुक्यातील गोदाकाठ भागात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यावर बचाव व शोधकार्य करणे तसेच जिल्ह्यातील कोणी बुडाले असेल त्या ठिकाणी जाऊन शोधकार्य करणे अशी कामे विनामूल्य केली जातात. सध्या कोरोना महामारी सुरू असताना आपत्ती व्यवस्थापन समिती तंदुरुस्त असणे गरजेचे असल्याने समितीचे प्रमुख सागर गडाख यांनी प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे , तहसीलदार शरद घोरपडे यांच्याकडे मागणी केली असता प्रशासनाने तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देत समितीचे लसीकरण करून घेण्याचे सांगितले. लगेच प्रभारी निफाड तालुका कोविड-१९ संपर्क अधिकाऱ्यांनी लस उपलब्ध करून देत स्वयंसेवकांचे लसीकरण पूर्ण केले.
चांदोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकुंद सवाई, आरोग्य सहाय्यक अरुण कहांडळ, डॉ. जया ताकतोंडे, अमोल नाठे, संतोष वेढे, डॉ प्रियंका पवार, महेश चौधरी, हरीश आवारे आदी कर्मचाऱ्यांनी लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदविला.