शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

वापरून कचऱ्यात फेकलेला मास्क ठरतोय धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 01:12 IST

नाशिक : शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लाखो नागरिक मास्कचा वापर करीत असले, तरी नंतर हा मास्क थेट रस्त्यात फेकून देणे किंवा घरगुती कचऱ्यात फेकण्याचे प्रकार वाढत असून, त्यामुळे महापालिकेची यंत्रणाही अडचणीत येत आहे. कचऱ्यातील हे मास्क सफाई कामगारांसह अन्य नागरिकांनाही संसर्गासाठी धोकादायक ठरू शकतात.

ठळक मुद्देपालिकेची नष्ट करण्यासाठी तारांबळ : कामगारांसह अनेक जण बाधित होण्याची शक्यता

नाशिक : शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लाखो नागरिक मास्कचा वापर करीत असले, तरी नंतर हा मास्क थेट रस्त्यात फेकून देणे किंवा घरगुती कचऱ्यात फेकण्याचे प्रकार वाढत असून, त्यामुळे महापालिकेची यंत्रणाही अडचणीत येत आहे. कचऱ्यातील हे मास्क सफाई कामगारांसह अन्य नागरिकांनाही संसर्गासाठी धोकादायक ठरू शकतात.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी जी त्रिसूत्री घालून दिली आहे. त्यात मास्कचा वापर अपरिहार्य ठरला आहे. मात्र, अनेक नागरिक मास्क वापरून झाल्यानंतर ते रस्त्याच्या कडेला फेकून देतात, तसेच अनेक नागरिक घरातील कचऱ्यात टाकून देतात. त्यामुळे घंटागाडीत टाकलेला हा कचरा घरगुती कचऱ्यात मिसळला जातो. त्याला हाताळण्यातून संसर्गही होऊ शकतो.मास्कचा वापर नागरिक करतात, ही चांगली बाब असली, तरी त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबत त्यांना माहिती नाही. मास्क वेगळ्या कागदी पिशवीत दिल्यास महापालिकेच्या घंटागाडीत घातक कचऱ्यासाठी वेगळा लाल डबा असतो. त्यात टाकून तो सुरक्षित नेता येईल, परंतु नागरिक ओला-सुका कचराही वर्गीकरण करून देत नाहीत, तेथे मास्कची स्वतंत्र पिशवी कोण देणार, असा प्रश्न आहे.नागरिकांनी वापरलेल्या मास्कची असुरक्षित पद्धतीने हाताळणी धोकादायक ठरू शकते. नागरिक मास्क घरगुती कचऱ्याच्या डब्यात टाकून दुसऱ्या दिवशी घंटागाडीत देतात. मात्र, त्याच्या हाताळणीतून घंटागाडी कामगारांना धोका निर्माण होऊ शकतो. अनेक घंटागाडी कामगारांना यापूर्वीही कोरोना संसर्ग झाला आहे. नागरिकांना मास्कची शास्त्रोक्त विल्हेवाट लावता येत नसली, तरी रस्त्यावर टाकू नये अथवा घरगुती कचऱ्यातच टाकून देऊ नये.- डॉ. कल्पना कुटे, संचालक घनकचरा व्यवस्थापन.दररोजच्या कचऱ्यातील मास्कचे काय?नाशिक महापालिकेच्या वतीने पाथर्डी शिवारात असलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात इन्सिनरेटर म्हणजे मोठी भट्टी आहे. महापालिकेच्या घंटागाड्यातून येणाऱ्या सहाशे टन कचऱ्यात मास्क सापडल्यानंतर, ते या भट्टीत नष्ट केले जातात. नागरिकांनी घंटागाडीत स्वतंत्र पद्धतीने मास्क दिल्यास, त्यात घातक कचऱ्यासाठी वेगळी पेटी असते. त्यात सोडियम व्हेपोराइड असते. त्यात असे मास्क टाकून नंतर ते खतप्रकल्पावरील घंटागाडीत नष्ट केले जातात.रुग्णालयातील घातक कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाटनाशिक शहरात २००० मध्येच जैविक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी कन्नमवार पुलाजवळ प्रकल्प आहे. तेथे घातक कचरा भट्टीमध्ये विशिष्ट तापमानात टाकून नष्ट केला जातो. तर ज्या वस्तू रिसायकल होऊ शकतात, त्या तुकडे-तुकडे करून संबंधीित कारखान्यांपर्यंत पोहोचविल्या जातात. नाशिकमध्ये सुमारे वीस वर्षांपूर्वी अशा प्रकारचा जैविक कचरा निर्मूलन प्रकल्प राबविण्यात आला. आता कोरोना काळात तो उपयुक्त ठरत आहे.६०० टन शहरात रोज निघणारा कचरा ४०० टन ओला कचरा २०० टन सुका कचरा 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या