शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सलून व्यावसायिकांकडून पीपीई किटचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 01:01 IST

नांदूरवैद्य : कोरोना संसर्गामुळे गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेला सलून व्यवसाय पूर्ववत सुरू झाला असतानाच आता ग्रामीण भागातही या व्यावसायिकांकडून पीपीई कीट घालून स्वत:स ग्राहकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाऊ लागले आहे. सलूनमध्ये ग्राहकांकडूनही सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेतली जात असल्याचे दिसून येत आहे.

नांदूरवैद्य : कोरोना संसर्गामुळे गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेला सलून व्यवसाय पूर्ववत सुरू झाला असतानाच आता ग्रामीण भागातही या व्यावसायिकांकडून पीपीई कीट घालून स्वत:स ग्राहकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाऊ लागले आहे. सलूनमध्ये ग्राहकांकडूनही सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेतली जात असल्याचे दिसून येत आहे.नाशिक जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता आकडा पाहता कोरोनापासून बचाव करण्यासाठी स्वत:ची काळजी स्वत:च घेणे गरजेचे झाले आहे. त्यात सलून व्यावसायिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. त्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील सलून व्यवसाय कोरोनापासून पुरेपूर काळजी घेतांना दिसत आहेत.काही दिवसांपूर्वीच शासनाच्या आदेशानुसार लॉकडाऊन काळात बंद करण्यात आलेले सलून व्यवसाय काही प्रमाणात सुरू झाले असले तरी काही भागात कोरोनाबाधित रु ग्ण आढळल्यामुळे त्या भागातील सलून व्यवसाय अजूनही सुरु झाले नाहीत. यामुळे अशा परिस्थितीत ग्राहकांना दुकानात येतांना सुरक्षित वाटावे यासाठी पीपीई किट खरेदी केले असून त्याच्या नियमति वापरामुळे ग्राहक देखील मनात संकोच न करता दुकानात येत असतात. ग्राहकांना देखील मास्क लावल्याशिवाय दुकानात प्रवेश दिला जात नाही. काम झाल्यानंतर सर्व साहित्य सॅनिटायझर मारून स्वच्छ केले जाते. अर्थात यासाठी खर्च वाढला असला तरी सुरक्षिततेसाठी हे आवश्यकच असल्याचे सलून व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यासाठी आता संघटनास्तरावर दर वाढीबाबतही चर्चा होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.---------------------या पीपीई किट वापरामुळे ग्राहकांच्या संख्येतही वाढ होत आहे. ग्राहकांनाही त्यामुळे सुरक्षित वाटत आहे. नागरिकांनीही स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हात स्वच्छ साबणाने धुवावेत, तसेच बाहेर पडतांना तोंडाला मास्क लावूनच बाहेर पडावे. त्याशिवाय दुकानात प्रवेश दिला जात नाही.- योगेश कोरडे, सलून चालक

टॅग्स :Nashikनाशिक