शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

द्राक्षांवर निर्यातीसाठी प्रमाणित औषधांचाच वापर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 00:19 IST

या हंगामात अधिक पाऊस झाल्याने वातावरणात अधिक बाष्पनिर्मिती होऊन डावणी आणि भुरीसह विविध कीटक आणि अळी नियंत्रणाचे आव्हान द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे.

नाशिक : या हंगामात अधिक पाऊस झाल्याने वातावरणात अधिक बाष्पनिर्मिती होऊन डावणी आणि भुरीसह विविध कीटक आणि अळी नियंत्रणाचे आव्हान द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी छाटणीनंतर हंगाम सुरू होण्यापूर्वी जैविक औषधांचा व द्राक्षनिर्यातीसाठी प्रमाणित औषधांचा योग्य प्रमाणात वापर करणे आवश्यक असून, विविध प्रकारच्या कीटक नियंत्रणासाठी सापळ्यांचा अधिकाधिक वापर करण्याचा सल्ला राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञांनी द्राक्षबागायतदार शेतकºयांना दिला आहे.द्राक्ष उत्पादकांना शेती क्षेत्रातील विविध आव्हाने सध्या भेडसावत आहेत. उत्पादन ते विक्री यामध्ये येणाºया समस्यांवर मंथन करण्यासाठी नाशिक विभागीय द्राक्ष बागायतदार संघातर्फे मंगळवारी (दि.१७) दादासाहेब गायकवाड सभागृहात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी द्राक्ष उत्पादकांना मार्गदर्शन करण्यासाठी द्राक्ष शेती आणि संशोधन केंद्रातील मान्यवरांनी द्राक्ष विक्रीची सद्यस्थिती व भविष्यातील विक्री व्यवस्था, छाटणी ते फळधारणा व थंडीमध्ये द्र्राक्षाच्या आकाराविषयी करावयाच्या उपाययोजना, यशस्वी ग्राफटिंगचे तंत्र, द्राक्षबागेतील नवीन कीड व त्याचे नियंत्रण, द्राक्षबागेतील नवीन बुरशीजन्य रोग व त्यांचे नियंत्रण, जास्त पर्जन्यमानामध्ये द्र्राक्षवेली पोषणावर होणारे परिणाम, संजीवकांचा अतिवापर व त्याचे परिणाम तसेच येणाºया द्राक्ष हंगामाचा आढावा या विषयांवर सह्याद्री फार्मचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, विजय जाधव, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आर. जी. सोमकुवर, डॉ. दीपेंद्र सिंग यादव, डॉ. ए. के. उपाध्याय, डॉ. एस. डी. रामटेके व स्कायमेंटचे हवामान तज्ज्ञ योगेश पाटील याविषयी मार्गदर्शन केले.द्राक्ष उत्पादक संघाचे विभागीय अध्यक्ष रवींद्र बोराडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मानद सचिव अरुण मोरे व कोषाध्यक्ष कैलास भोसले यांच्यासह माजी विभागीय अध्यक्ष माणिकराव पाटील उपस्थितीत होते.दरम्यान, द्राक्ष शेतीत उल्लेखनीय काम करणाºया ज्योत्स्ना दौंड, रूपाली बोरगुडे यांच्यासह संघाचे सभासद सुरेश कमानकर व हेमंत पिंगळे यांना राज्य शासनाच्या कृषी विभागाचा कृषिभूषण पुरस्कार मिळल्याबद्दल सत्कार करण्यात आला.समस्या गांभीर्याने घेण्याची गरजद्राक्ष उत्पादक शेतकºयांसमोर सध्या अनेक आव्हाने आहेत. त्यामुळे सरकारने द्राक्ष उत्पादक शेतकºयांच्या समस्या गांभीर्याने घेण्याची गरज असून, शेती क्षेत्रातील विविध योजनांचा द्राक्षबागायतदार शेतकºयांनाही लाभ देण्याची गरज असल्याचे मत नाशिक विभागीय द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष रवींद्र बोराडे यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी