शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिकेतील दलित वस्ती निधीचा वापर अन्य प्रभागांसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 18:57 IST

शिवसेनेचा आरोप : भाजपा नगरसेवकांच्या प्रभागात खैरात

ठळक मुद्देदलित वस्ती सुधारणा निधीच्या खर्चाबाबतचे आॅडिट करण्याची मागणीदलित वस्तीवर महापालिकेने गेल्या तीन वर्षांत केलेल्या खर्चाचा तपशिलच पुराव्यानिशी सादर

नाशिक - महापालिकेने मागासवर्गियांसाठी राखीव ठेवलेल्या ५ टक्के निधीचा वापर दलित वस्ती सुधारणेवर करण्याऐवजी ज्याठिकाणी मागासवर्गिय वसाहती नाहीत, अशा प्रभागांवर केला असून त्यात बव्हंशी भाजपा नगरसेवकांच्या प्रभागत निधीची खैरात करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. दलित वस्ती सुधारणा निधीच्या खर्चाबाबतचे आॅडिट करण्याची मागणीही शिवसेनेने केली आहे.विरोधीपक्षनेता अजय बोरस्ते आणि शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत दिवे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दलित वस्तीवर महापालिकेने गेल्या तीन वर्षांत केलेल्या खर्चाचा तपशिलच पुराव्यानिशी सादर केला. यावेळी प्रशांत दिवे यांनी सांगितले, सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरीता दलित वस्ती सुधारणा निधी म्हणून १३ कोटी २४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली तर आतापर्यंत २४ कोटी २ लाख रुपयांची प्राकलने वेगवेगळ्या स्तरावर कार्यवाहीत आहेत. १४ कोटी ९६ लाखांच्या शिल्लक निविदा असून या वर्षात आतापर्यंत ८७ लाख ६३ हजार रुपयांची देयके अदा होऊ शकली आहेत. दलित वस्ती सुधारणेवर अंदाजपत्रकापेक्षा २६ कोटी ६१ लाख रुपये खर्च दाखविण्यात आला आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांत या निधीअंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेल्या कामांचा तपशिल पाहता, मागासवर्गिय वसाहती या निधीपासून वंचित ठेवण्यात आल्या आहेत तर ज्याठिकाणी मागासवर्गिय वसाहती अथवा लोकसंख्या नाही तेथे कोट्यवधी रुपयांची कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. प्रभाग १७ हा मागासवर्गियांची लोकसंख्या असलेला सर्वात मोठा प्रभाग आहे. परंतु, याठिकाणी एकही काम प्रस्तावित नाही याऊलट या निधीतून पेठरोड ते पेठनाका कॅनालपावेतो ३ कोटी १५ लाख रुपये खर्चाचा डांबरी रस्ता प्रस्तावित केलेला आहे. प्रभाग ४ मधील तारवालानगर, सहकार नगर याठिकाणी पथदीप तर श्रीरामनगर येथील उद्यानात समाजमंदिर प्रस्तावित केलेले आहे. लामखेडेमळा येथील मोकळ्या भूखंडावर अभ्यासिका, लोकसहकारनगरमध्ये ६० लाखांचे काम तर प्रभाग २ मधील मराठानगर मध्ये २४ लाखांचे मलवाहिका टाकण्याचे प्रस्तावित केलेले आहे. महापौरांच्या प्रभाग १ मधील केतकी सोसायटी परिसरातही ७७ लाख रुपये खर्चाची अभ्यासिका प्रस्तावित आहे. कामांच्या यादीचे अवलोकन केले असता भाजपा नगरसेवकांच्या प्रभागांवर दलित वस्तीच्या निधीची खैरात करण्यात आलेली आहे. दलित वस्ती सुधारणा निधी अन्य प्रभागांसाठी वापरण्यात येत असून या सा-या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही प्रशांत दिवे यांनी केली आहे. सदर प्रकरण आपण धसास लावणार असून प्रसंगी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचीही तयारी असल्याचे दिवे यांनी स्पष्ट केले.महासभेत आवाज उठवणारमुळात मागासवर्गियांसाठी राखीव ५ टक्के निधीची तरतूदच केली जात नाही. वास्तविक, दलित वस्ती सुधारणा निधी हा वंचित घटकांसाठीच वापरला पाहिजे. तो अन्यत्र वळविता येत नाही. मात्र, याठिकाणी भाजपाच्या विशिष्ट नगरसेवकांच्या प्रभागात हा निधी वळविण्याचा प्रयत्न दिसून येतो आहे. या सा-या प्रकरणाचे आॅडिट होण्याची गरज आहे. येत्या महासभेत शिवसेना या प्रकरणी निश्चितच आवाज उठवणार आहे.-अजय बोरस्ते, विरोधीपक्षनेता,मनपा

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका