शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला रोखण्यासाठी सर्वच अस्त्रांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 00:38 IST

वणी : सातत्याने कोरोनाबाधितांची वाढती संख्या, आरोग्य प्रशासनावर मर्यादा, खासगी रुग्णालयासंदर्भातील असमाधानकारक उपचार सेवा व शहरी भागातील उपचारासाठी आर्थिक मर्यादा अशा सर्व चक्रव्यूहामध्ये कोरोनाबाधित सापडले आहेत. बाधितांच्या संख्येत होणारी चिंताजनक वाढ ही बाबच कोरोनाचा सामना करण्यासाठी असहाय परिस्थिती निर्माण करीत असल्याने या महामारीचा सामना कसा करावा, असा प्रश्न सामान्यांपुढे उभा ठाकला आहे.

ठळक मुद्देवणी : ग्रामीण भागातील बाधितांची वाढती संख्या चिंताजनक

वणी : सातत्याने कोरोनाबाधितांची वाढती संख्या, आरोग्य प्रशासनावर मर्यादा, खासगी रुग्णालयासंदर्भातील असमाधानकारक उपचार सेवा व शहरी भागातील उपचारासाठी आर्थिक मर्यादा अशा सर्व चक्रव्यूहामध्ये कोरोनाबाधित सापडले आहेत. बाधितांच्या संख्येत होणारी चिंताजनक वाढ ही बाबच कोरोनाचा सामना करण्यासाठी असहाय परिस्थिती निर्माण करीत असल्याने या महामारीचा सामना कसा करावा, असा प्रश्न सामान्यांपुढे उभा ठाकला आहे.वणी व परिसरात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला. वणी गावातील व्यावसायिक, नागरिक व प्रशासन यांनी समन्वयात्मक घेतलेल्या निर्णयानुसार पालन केले जात आहे. वणी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णसंख्या ही क्षमतेपेक्षा अधिक असल्याने ग्रामीण रुग्णालयात कोविड कक्षासाठीची प्रक्रिया राबविण्यासाठी गतिमानता आली आहे. ग्रामीण रुग्णालयात इतर आजार व उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना पांडाणे प्राथमिक आरोग्य केंद्र व दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाचा पर्याय राहणार आहे. वणी ग्रामीण रुग्णालयात दिंडोरी, चांदवड, सुरगाणा या तीन तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी येतात. सुमारे ३०० च्या पुढे ओपीडी असते. त्यात विविध आजारांचे रुग्ण तपासणी व उपचारासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात येतात. मात्र सध्या कोविड बाधितांची संख्या पाहता, रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्यासाठीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. बोपेगाव येथे असलेल्या कोविड सेंटरमध्ये वणीच्या तुलनेत आरोग्य सुविधेवर मर्यादा पडतात, अशी भावना बाधितांमध्ये आहे.वणी गावातील शैक्षणिक इमारत तसेच निवासव्यवस्था होऊ शकेल अशी ठिकाणे याबाबत पर्याय शोधला तर समस्येचे निराकारण होऊ शकेल. दिवसा दिवसाला कोरोनाचा वाढता प्रभाव, व्यवसाय बंद, उदरनिर्वाह कसा चालवायचा ही समस्या, उत्पन्नाचे मार्ग बंद व उपचारासाठी हातात पैसा नाही, अशी ही भीतीदायक वास्तविकता समोर उभी ठाकल्याने कठीण परीक्षेला सामोरे जावे लागत आहे.(१५ कोरोना १)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य